देवणी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती
शेतीमाल विक्रीची नोंदणी चालू .
देवणी:येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आवाहन करण्यात येते की, शेेतक-याांनी आपले शेती माल विक्री नोंदणी चालू करण्यात आले आहे .
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन काळामध्ये शेतकऱ्यांचे हित लक्षात घेवून पालकमंत्री मा.श्री.अमित विलासराव देशमुख,मा.जिल्हाधिकारी,मा.जिल्हा उपनिबंधक व मा.सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती देवणी यांचे सूचनेवरून महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेल्या सुचनेनुसार शेतकऱ्यांनी आपल्या मालाची नोंद सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत नोंदणी श्री.सुनील अशोकराव कळसे मो.क्र.8888882562 किंवा 8999353774
या क्रमांक वर करावे.
यामध्ये आपले नावं,गाव,मोबाईल नंबर,मालाचा प्रकार व किती पोते याबाबतची रीतसर माहिती नोंदवावी. ज्या शेतकऱ्यांनी नावं नोंदणी केली त्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती देवणीच्या वतीने SMS केला जाईल.
सदरील SMS मध्ये संपूर्ण माहिती दिली जाईल त्याच पद्धतीने दिलेल्या तारखेस व वेळेत आपण आपला शेतमाल खालील सुचनाचे पालन करून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात घेवून यावे.
शेतकऱ्यांनी शेतमाल बाजार समितीमध्ये आणतेवेळी फोनवर नोंदणी केलेलाच शेतमाल विक्रीसाठी स्वीकारला जाईल,
शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र (उदा.आधारकार्ड/PAN कार्ड/मतदान ओळखपत्र/बँक पासबुक अथवा SMS आलेल्या मोबाईल) सोबत आणावे असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बालाजी बिरादार व प्रभारी सचिव सुनिल कळसे यांनी केेेले आहेत.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी या लिंकला क्लिक करा ...http://m.dailyhunt.in/news/india/marathi/btv+news+maharashtra-epaper-dh15a2a5d6de6241859afef7242464fdd3/devani+yethil+krishi+utpann+bajar+samiti+shetimal+vikrichi+nondani+chalu-newsid-dh15a2a5d6de6241859afef7242464fdd3_f5a973e0831011ea9eff5b39210d3014
ताज्या बातम्या पहाण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून youtube ला सबस्क्राईब करा..
0 Comments