🌸 *विश्वगुरू* 🌸
*जगाचे तारणहार वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज*
एप्रिल महिना उजाडला की जणू उत्सवांची पर्वणीच सुरू होते.२ एप्रिल रोजी भारतीयांच्या हृदयावर राज्य करणारे एकमेवाद्वितीय राजे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम चंद्र यांची जयंती - श्रीराम नवमी. ६ एप्रिल रोजी जैन धर्माचे संस्थापक भगवान महावीर यांची जयंती. ११ एप्रिल रोजी बहुजनांचे उद्धारक महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला. १४ एप्रिल रोजी समस्त मानव जातीचे उद्धारक महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म दिवस अर्थात भिमजयंती. ३० एप्रिल रोजी 'ग्रामगीते' सारखा अमूल्य ग्रंथ लिहिणारे श्रेष्ठ संत कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्मदिन.
*_गाव हा विश्वाचा नकाशा । गावावरून देशाची परीक्षा । गावच भंगता अवदशा । येईल देशा ।_*
ग्रामविकासाच्या स्वप्नाने झपाटलेल्या राष्ट्रसंतांनी स्वतःची जयंती 'ग्रामजयंती उत्सव' म्हणून साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली होती.आज आपण त्यांची इच्छा साकार करूया व ३० एप्रिल रोजी राष्ट्रसंतांची जयंती'ग्रामजयंती उत्सव'म्हणून साजरा करूया.
सत्तेचे विकेंद्रीकरण,मग ती अर्थसत्ता असो किंवा राजसत्ता,हाच ग्रामगीता तत्वज्ञानाचा 'आत्मा' आहे. ग्रामगीतेचे हेच तत्त्वज्ञान आजही किती लागू आहे, यावरून त्याची महानता आपल्या लक्षात येईल. भारताला विश्वगुरु पद मिळवून देण्याची क्षमता याच तत्त्वज्ञानात आहे. भारताला महासत्ता बनविण्याची क्षमता देखील याच तत्त्वज्ञानात आहे.आधुनिक विज्ञानाने निर्माण केलेली आधुनिक समाज व्यवस्था किती क्षणभंगुर आहे,याची प्रचिती आपण सर्वजण अनुभवत आहोत.ग्रामगीतेत वर्णन केलेली शाश्वत अर्थव्यवस्था व शाश्वत समाजव्यवस्था, हे केवळ स्वप्नरंजन नसून तत्वज्ञानावर आधारित वास्तविकता आहे.आधुनिक विज्ञानाने खूप प्रगती केली आहे, परंतु त्याला तत्वज्ञानाचे अधिष्ठान नसल्याने ते दिशाहीन बनले असून विज्ञान वरदानाऐवजी शाप ठरत आहे. जसे मंडप कितीही मोठा असला तरी त्याला झालरीशिवाय शोभा येत नाही, तसेच आधुनिक विज्ञान कितीही प्रगत झाले तरीही अध्यात्मिक तत्वज्ञानाच्या अधिष्ठानशिवाय ते फोल ठरत आहे.भविष्यात विज्ञानाला दिशा देण्याचे काम ग्रामगीता तत्वज्ञान करेल , यात तीळमात्र शंका नाही.वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हेच खरे विश्वगुरू असून जगाचे एकमेव तारणहार आहे.
आज संपूर्ण जगाला हादरून सोडणाऱ्या कोरोना महामारीच्या संदर्भात राष्ट्रसंतांचे विचार जाणून घेऊया.
*_मद्यमांसाहार करीती कोणी । विकारबुद्धी वाढे मनमानी । भलतेचि रोग जाती लागोनि । सांसर्गिक आदी ।।९४।। अध्याय १४-ग्राम आरोग्य_*
रोगावरील उपचाराबाबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज काय सांगतात?
*_अपुल्याच गावची वृक्षवेली । कंदमुळे आणूनी औषधी केली। निसर्गोपचारासहीत दिली । पाहिजेत वैद्य ।_*
लोकांना आरोग्याच्या बाबतीत राष्ट्रसंत काय सांगतात?
*_नको वैद्य अथवा डॉक्टर । आपणचि व्हावं आरोग्य तत्पर ।_*
विषमतेवर आधारित भांडवलशाही अर्थव्यवस्था व शोषणावर आधारित व्यापाराला प्रोत्साहन देणारी आधुनिक चिकित्सा प्रणाली नाकारून साधी,सरळ व सोपी निसर्गोपचार पद्धती अवलंब करण्याचा सल्ला राष्ट्रसंतांनी दिला आहे.
आधुनिक विज्ञानाने देखील या गोष्टीवर चिंतन मनन करणे आवश्यक आहे.निसर्गसुलभ व पर्यावरणपूरक उपाय योजनांवर अभ्यास व संशोधन करून आपल्या उपचारांची दिशा ठरविणे काळाची गरज आहे.अध्यात्म व विज्ञान यांच्यामध्ये सुंदर मिलाफ घडवून सुवर्ण मध्य साधणं,हीच आजच्या काळाची गरज आहे. संत बोधावर आधारित अध्यात्मिक सिद्धांतावर वैज्ञानिक प्रयोग करून या पृथ्वीतलावर 'भुवैकुंठ' निर्माण करणे,हीच विश्वगुरू तुकडोजी महाराजांना खरी आदरांजली ठरेल !!!