पिकांचा उत्पादन खर्च कमी करणे
"शेतीशाळा शेतकऱ्यांसाठी वेबीनारचे आयोजन"
देवणी, ता.२० (बातमीदार) :संपूर्ण जगासह भारतातील कोरोना मुळे उद्भवलेली जागतिक महामारी सारखी परिस्थिती त्यामुळे जनजिवनावर झालेला परिणाम याचा विचार करून कोरोना वर मात करण्यासाठीच्या उपाय योजनांसह येणाऱ्या खरिपाच्या पार्श्वभूमीवर नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोखरा) कार्यालयामार्फत शुक्रवारी (ता.२२ ) सकाळी ९.३० वाजता राज्यातील पोखरा अंतर्गत राबवण्यात येत आसलेल्या शेतकरी शेतीशाळा प्रयोजनार्थ शेतकऱ्यांसाठी " पिकांचा उत्पादन खर्च कमी करणे " या विषयावर झूम ऐपवर वेबिनार (zoom webinar) ई-परिसंवाद आयोजित केलेला आहे.
यामध्ये गेल्या दोन वर्षापासून राज्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यशस्वी पणे राबविण्यात येत आसून त्यामुळे क्रषि क्षेत्रात हवामान आधारित शेती केल्याने शेतीवरील खर्च कमी करून अधिकचे उत्पादन कशा प्रकारे घेता येत आहे त्या बद्दल सर्व शेतकऱ्यांना राज्यातील तज्ञांचे व अनुभवी शेतकऱ्यांचे मार्गदर्शन व मनोगत ऐकता येणार आहे. या वेबीनार मधे भाग घेण्यासाठी आपल्या अँड्रॉइड मोबाईल किंवा लैपटॉप वर bit.ly/ffs2205 या लिंकवर क्लिक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन प्रकल्प संचालक विकास रस्तोगी यांनी केले आहे.
0 Comments