🌴रानमाळ🌴
रानमाळावर उभ्या झाडावर सळसळणार्या पान-फुलावर !
डोंगराच्या चढउतारावर
काळ्या मातीच्या आशेवर!
उर भरुन यईस्तोर
माझा शेतकरी बाप राब राब राबतो!
उद्याच्या आशेवर
निसर्गाच्या भरोशावर !!
काळी माती रुसनार नाही
पोशींद्याला फसवणार नाही !
सर्व मानवाचा हा देवता
उभ्या जगाचा अन्नदाता !!
पोशिंद्याची हिम्मत भारी
पाहाटेच करुन जातो न्याहारी !
सुर्याला करतो नमस्कार शेतात
रानमाळ हीच त्याची साथ!!
बालाजी येळगे
मु.पो.सावळी
ता.मुखेड जि.नांदेड
0 Comments