झाडिपट्टी कलावंतांच्या समस्या सोडवण्यासाठी मागण्यांचे निवेदन..
मनसे चित्रपट कर्मचारी सेनेकडे कलावंतांचे लक्ष..!

मुंबई / प्रतिनिधी (महेश कदम) : झाडिपट्टी नाट्य विकास संस्था यांनी झाडिपट्टी कलावंतांच्या समस्या सोडवण्यासाठी श्री.पदमनाभ राणे यांच्या माध्यमातून मनसे चित्रपट कर्मचारी सेना अध्यक्ष श्री.अमेय खोपकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
       महाराष्ट्रातील विदर्भातील दुर्गम व आदिवासी भागात झाडीपट्टी रंगभूमी ही स्वतंत्र पूर्व काळापासून कार्यरत आहे. ह्या रंगभूमीची निर्मिती ही आदिवासी भागातील लोकांमध्ये जनजागृती आणि प्रबोधन करण्याच्या हेतूने झाली असून इंग्रजी सत्तेला समजू नये व स्वातंत्र्याची चळवळ पुढे नेता यावी या उद्देशाने नाटकाच्या रुपात केली गेली.
      स्वतंत्र पूर्व काळात इंग्रर्जांना हा केवळ आदिवासी भागातील मनोरंजनाचा भाग वाटायचा परंतु याच मुख उद्द्श हे सामजिक एकोपा, बंदुभाव, जनजागृती, प्रबोधन आणि स्वातंत्र्याची चळवळ उभी करणे हा होता.सध्या ही रंगभूमी आदिवासी व दुर्गम भागातील मनोरंजनाचा काम करीत असून महाराष्ट्रातील विशिष्ठ भागातील ही रंगभूमी आणि कलावंत आजवर प्रसिद्धी, आर्थिक उन्नती, आणि शासकीय योजना ह्या सर्वच गोष्टीसाठी ही रंगभूमी व इथले कलावंत हे वंचित राहिले आहेत. त्यामुळे कलावंत असून देखील महाराष्ट्राच्या ठराविक भागापुरतेच त्यांचे अस्तित्व मर्यादित राहिले असून ह्या कलाकारांची उन्नती आणि प्रगती आजवर झाली नाही. संपूर्ण विदर्भातील आदिवासी भागात चालणाऱ्या झाडीपट्टी ह्या नाट्य प्रकारामध्ये जवळपास ५५ नाट्य संस्था कार्यरत असून प्रत्येक नाट्य संस्थेत ७ पुरुष कलावंत, ४ महिला कलावंत, ३ म्युजीशीअन ( ऑर्गन / प्याड / तबला ), २ प्रौटर, १ नाट्य निर्माता, १ म्यानेजर, ३ ड्राईव्हर, १४ ब्याक स्टेज वर्कर ( तंबू उभा करणे, पडदे लावणे, बैठक व्यवस्था, कार्यक्रमाचे नियोजन, मेकअप रूम इत्त्यादी कामे ) अशी जवळपास ३५ कलावंतांची टीम प्रत्येक नाट्य संस्थेत काम करीत आहे. ५ ते ६ महिने चालणाऱ्या ह्या व्यवसायात ह्या दुर्गम भागात १५०० प्रयोग केले जातात. यातील सर्वसामान्य कलावंतांचे मानधन हे ३०० रु. ते १००० रु. इतका अत्यल्प असून ह्या सर्व कलावंतांचे उपजीविकेचे आणि उदरनिर्वाह चे साधन हे झाडीपट्टी रंगभूमी असून आज ह्या कलावंतांनवर प्रयोग बंद असल्या कारणाने उपासमारीची वेळ आली आहे.
महाराष्ट्रातील लोककला आणि लोककलावंत हा आपल्या राज्याचा कणा असून महाराष्ट्राने आजवर अनेक मोठे कलावंत आपल्या राज्याला दिले आहेत आणि आपली ही लोककला आणि परंपरा आपण जपण्याची आणि जोपासण्याची आवश्यकता असून महाराष्ट्रातील दुर्गम भागातील ही लोककला आणि हे कलावंत ह्यांना आज शासकीय वरदहस्थ मिळण्याची नितांत आवश्यकता असून शासकीय निधीतून एक ठराविक आपत्त्ती निधी म्हणून ह्या कलावंतांनसाठी तात्काळ उपलब्ध करून द्यावी व भविष्यात ह्या रंगभूमी च्या जतन, संगोपन आणि संवर्धन या साठी नवीन योजना निर्माण कराव्या व त्या आमलात आणाव्या असे मत मनसे चित्रपट सेना उपाध्यक्ष श्री. पदमनाभ राणे ह्यांनी व्यक्त केले आहे.अखिल झाडीपट्टी नाट्य विकास संस्था तथा झाडीपट्टी नाट्य निर्माता संघटना याचे अध्यक्ष परमानंद गहाणे यांनी ह्या कलावंताच्या समस्या सोडवण्यासाठी मनसे चित्रपट कर्मचारी सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांना पत्र लिहिले असून झाडीपट्टी कलावंतांना न्याय मिळून देण्याची मागणी मनसे चित्रपट सेने कडे केली आहे. अशी संपूर्ण माहिती श्री.पदमनाभ राणे (उपाध्यक्ष चित्रपट कर्मचारी सेना मनसे) ह्यांनी दिली आहे.
       वाचत रहा..! पहात रहा...!! अपडेट रहा...!!!

महाराष्ट्रातील सत्य घडामोडींचा वेध घेण्यासाठी शेती आणी शेतक-यांच्या हितासाठी सदैव तत्पर आसलेले न्यूज चैनल बि.टि.व्हि.न्यूज महाराष्ट्र चैनलला सबस्क्राईब करा..व बेल आयकॉन दाबून बातमीला लाईक जरूर करा व शेर करायला विसरू नका.. हेच शेतकऱ्यांना व या चैनलला प्रोत्साहन मिळेल व आपली व महाराष्ट्राची सेवा जोमाने करता येईल.


         BTV NEWS MAHARASHTRA