कलावतांना जगण्यासाठी साधन उपलब्ध करून द्या...!!
प्रदेशाध्यक्ष युवक सुशांतभाऊ गोरवे नँशनल सोशालिस्ट पार्टी कडून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंंना निवेदन
मुंबई / प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यातील वाद्य कलावंतांना आपले वाद्य वाजविण्यास परवानगी मिळावी आसे बॅण्ड ,बँजो, डिजे वादक यांच्या वतीने निवेदन देवून आपल्या व्यथा मांडल्या संपूर्ण कुटुबांचा उदरनिर्वाह सदर व्यवसायावर अवलंबून आहे. माञ गेल्या ३ महिन्यापासून संपूर्ण देश लाॅकडाऊन असल्यामुळे आमचा व्यवसाय पूर्णपणे बंद आहे .शासनाने अनेक व्यवसाय चालु करण्यास सध्या परवानगी दिलेली आहे माञ आमचा व्यवसाय चालू करण्यास परवानगी दिलेली नाहि त्यामुळे आमच्या कुटुबाची उपासमार होत आहे.
शासनाने लग्न व इतर समारंभास मोजक्या लोकांसाठी परवानगी दिलेली असल्यामुळे आम्हास देखील
वाद्य वाजविण्यास परवानगी देण्यात यावी.सदर कामे करताना आम्ही शासनाच्या नियमांंचे पालन करून व्यवसाय करण्यास तयार आहोत आदी मागण्या विषयी वाद्य कलावंतांच्या वतीने नैशनल सोशालिस्ट पार्टीचे युवक प्रदेशाध्यक्ष सुशांतभाऊ गोरवे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडे मागणी केली आहे.
0 Comments