कवी लेखक साहित्यिक ते सर्जनशील मनाचा पत्रकार
-- शंकर बोइनवाड
उदगीर / प्रतिनिधी : मराठवाड्यातील साहित्य क्षेत्रात एक नविन व्यक्तीमत्व उदयास येत आहे ज्यांनी आल्पावधीतच कवि व लेखक म्हणून साहित्य क्षेत्रातील लिखाण विशेष करून त्यांचे लेखन हे बालकांना उपयुक्त आसून लहान मुलांच्या शिक्षणासाठी ची त्यांची तळमळ त्यांच्या लिखानातून दिसून येते.त्याच बरोबर शंकर बोईनवाड यांनी पत्रकारिता क्षेत्रांत सुद्धा आपला ठसा उमटवला आहे.
शंकर बोईनवाड यांचा जन्म एका गरीब कुटूंबात झाला घरचे नवकोटी दारिद्र्य यांच्यावर मात करून शंकर शिकला पाहिजे म्हणून त्यांच्या वडिलांनी जीवाचे रान केले शंकर यांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून* *जीवाचा आटापिटा केला शंकर बोईनवाड यांना प्राथमिक शाळेत प्रवेश दिला शंकर बोईनवाड लहानपणा पासून चाणाक्ष बुद्धीचे त्यांनी आपल्या बुद्धिकौशल्याच्या जोरावर प्राथमिक, माध्यमिक ,व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले घरची आर्थिक परिस्थिती अतिशय हाला कीची असल्याने अनेक नोकरीच्या संधी निघून गेल्या परंतु शंकर बोईनवाड यांनी कसल्याच प्रकारची हार पत्करली नाही उच्च विद्या विभूषित असलेले शंकर बोईन वाड यांना मराठवाड्यातील नामांकित कवी लेखक साहित्यिक यांची ओळख झाली त्यांच्या सानिध्यात असताना त्यांचे साहित्य वाचून शंकर बोईनवाड याना साहित्याची आवड निर्माण झाली शंकर बोईन वाड यांच्यातील अभ्यासु वृत्ती उपजत असलेली साहित्याची आवड यामुळे शंकर बोईन वाड यांनी साहित्यिक क्षेत्रात दमदार प्रवेश केला आणि कथा, कविता लेख अश्या दर्जेदार साहित्याची निर्मिती शंकर बोईन वाड यांनी केली एक अभ्यासु साहित्यिक म्हणून नावारूपाला आले
शंकर बोईनवाड गेली तीन चार दशकापासून पत्रकारी क्षेत्रात काम करीत आहेत त्यांनी वर्तमान पत्राच्या माध्यमातून दलित शोषित बहुजन समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात लिखाण करून शासन प्रशासनाकडून न्याय मिळवून देण्याचे काम शंकर बोईनवाड यांनी केला आहे आजतागायत करीत आहेत त्यांची जल्मभूमी नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुका असली तरी नोकरीच्या शोधात उदगीर येथे येऊन आपली कर्मभूमी उदगीर केली उदयगिरी बाबाच्या नगरीत आपले बस्तान बसवले उदगीर येथील जेष्ठ पत्रकार पत्रकारिता क्षेत्रातील पितामह ज्यांनी संपूर्ण पत्रकाराचे मार्गदर्शक कै.व्यंकटराव सगर सर यांच्या सानिध्यात राहून बराच काळ पत्रकारिता शंकर बोईनवाड यांनी केली व्यंकटराव सगर सर यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीरच्या विकासासंदर्भतील अनेक प्रश्न शंकर बोईनवाड यांनी मांडले पत्रकारिता कशी करावी पत्रकारिता क्षेत्रातील खाच खळगे शिकून घेऊन शंकर बोईनवाड हे स्वतः शिक्षण क्षेत्राला वाहिलेले शालेय संकल्प नावाचे वृत्तपत काढून शिक्षण, साहित्यिक, कवी शिक्षक, कवि यांना न्याय देण्याचे काम बोईनवाड करीत आहेत त्यांचे कार्य पत्रकारिता ,कवी,साहित्यिक, लेखक म्हणुन त्यांचे कार्य नेत्रदीपक आहे त्यांच्या हातून असेच कार्य घडो..
पत्रकारिता क्षेत्रातील एक पुरस्कार प्राप्त झुंजार पत्रकार व संपूर्ण मराठवाड्याला कवी लेखक साहित्यिक म्हणुन सुपरिचित असलेले शंकर बोइनवाड यांचा आज वाढदिवस आहे त्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा..!!
वाचत रहा..! पहात रहा...!! अपडेट रहा...!!!
महाराष्ट्रातील सत्य घडामोडींचा वेध घेण्यासाठी शेती आणी शेतक-यांच्या हितासाठी सदैव तत्पर आसलेले न्यूज चैनल बि.टि.व्हि.न्यूज महाराष्ट्र चैनलला सबस्क्राईब करा..व बेल आयकॉन दाबून बातमीला लाईक जरूर करा व शेर करायला विसरू नका.. हेच शेतकऱ्यांना व या चैनलला प्रोत्साहन मिळेल व आपली व महाराष्ट्राची सेवा जोमाने करता येईल.
BTV NEWS MAHARASHTRA

0 Comments