बोगस सोयाबीन बियाणे कंपनी व विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करून त्यांचे परवाने रद्द करा व शेतकर्याना आर्थिक मदत द्या.!
--- वसंत सुगावे पाटील
नांदेड / प्रतिनिधी : जिल्हयात खरीप हंगाम सुरू झाला असुन बहुतांश शेतकर्यानी सोयाबीन पिकाची पेरणी केली आहे.यामध्ये काही कंपनिचे सोयाबीन उगवले नाही त्यामुळे अशा बोगस सोयाबीन कंपनी व विक्रेत्यांवर कार्यवाही करुन गुन्हे दाखल करावे व शेतकर्याना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी अप्पर जिल्हाधिकारी खुशालसींह परदेशी साहेब यांच्याकडे केली आहे.
नांदेड जिल्हा हा सोयाबीन उत्पादकांचा जिल्हा असुन नांदेड जिल्ह्यात सर्वाधीक उत्पादन हे सोयाबीन या पिकाचे असून बहुतांश शेतकर्यान्चे सोयाबीन हे मुख्य पीक आहे.त्यामूळे शेतकरी हे सोयाबीन पिकावर अवलंबून आहेत.अशातच काही कंपनी व विक्रेते यांनी बोगस सोयाबीन बियाणे विक्री केले आहे .व पेरणी केल्यानंतर हे पीक उगवलेच नाही.त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आला आहे.आधीच कोरोणा महामारिचे संकट व बोगस बियाणे यामूळे शेतकरी दुहेरी संकटाचा सामना करत आहेत .तसेच बँकाकडून खरीप पिकांचे पीककर्ज वाटप झालेले नाही. त्यामूळे शेतकर्यान्ची फसवणुक करनार्या कंपनी व विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करुन त्यांचे परवाने रद्द करावे.व शेतकर्याना दुसरे बियाणे द्यावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिल्हाउपाध्यक्ष मारोतराव कदम,राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष दगडगावकर,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष श्रीकांत मांजरमकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरसरचिटणीस युनूस खान,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हासरचिटणीस चक्रधर कळणे,जिल्हासंघटक पंडीत पा.जाधव,राष्ट्रवादी ग्रंथालय आघाडीचे तालुकाध्यक्ष अंकुश शिखरे,राष्ट्रवादी विद्यार्थीकाँग्रेसचे सरचिटणीस अमोल राजेगोरे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे देगलूर तालुकाध्यक्ष चंद्रकांत मोरे,नायगावचे विलास पा.धुप्पेकर,उत्कर्षकुमार भोसिकर,नितीन मामडी ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुदखेड तालुकाध्यक्ष शिवानंद शिप्परकर,राष्ट्रवादी सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष शादुल होनवडजकर आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वाचत रहा..! पहात रहा...!! अपडेट रहा...!!!
महाराष्ट्रातील सत्य घडामोडींचा वेध घेण्यासाठी शेती आणी शेतक-यांच्या हितासाठी सदैव तत्पर आसलेले न्यूज चैनल बि.टि.व्हि.न्यूज महाराष्ट्र चैनलला सबस्क्राईब करा..व बेल आयकॉन दाबून बातमीला लाईक जरूर करा व शेर करायला विसरू नका.. हेच शेतकऱ्यांना व या चैनलला प्रोत्साहन मिळेल व आपली व महाराष्ट्राची सेवा जोमाने करता येईल.
BTV NEWS MAHARASHTRA
0 Comments