शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठयपुस्तक वाटप
- सभापती चित्रकलाताई बिरादार
देवणी / प्रतिनिधी : कोरोना पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना घरी बसूनच सध्याच्या परिस्थितीत आभ्यास करता यावा म्हणून समग्र शिक्षा अभियान अंतर्गत देवणी तालुक्यातील सर्व शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तक वितरण कार्यक्रमास सुरुवात करण्यात आले.या वेळी देवणी पंचायत समितीच्या सभापती मा.सौ.चित्रकलाताई बिरादार,उपसभापती मा.शंकरराव पाटील तळेगावकर,सहाय्यक गट विकास अधिकारी मा.अच्युत पाटील गटशिक्षणाधिकारी मा. पारसेवार साहेब,श्री बाळासाहेब बिरादार,श्री महेश सज्जनशेट्टे, कृषी विस्तार अधिकारी श्री गोपणवाड जी.एन.पत्रकार मा. दत्ता पाटील सर यांच्या हस्ते केंद्रस्तरावर गाडी पाठवण्यात आली.
यावेळी साधनव्यक्ती राजेंद्र वजनम,राजकुमार जाधव,प्रविण डोईजोडे,आबासाहेब भद्रे,बाळासाहेब घाटे,आनंद बिरादार,विष्णू मोरे ,हरिश्चंद्र गोंधळी ,पाशा शेख, दीपक बोडके,दायमी एस.एम.,दायमी एन.एन.,मिनहाज सिद्दीकी,श्रीरंग सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
देवणी तालुक्यातील इ.1 ली ते 8 वी वर्गातील 9547 विद्यार्थ्यांना 55800 पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे.या सर्व पुस्तकांचे शाळास्तरावर दि.14 जुन2020पूर्वी वितरण होणार आहे.
0 Comments