त्या हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी
देवणी / प्रतिनिधी : होळ तालुका केज जिल्हा बीड येथे  मुस्लिम समाजातील नागरिकांवर हल्ला करनाऱ्या समाजकंटक  दहशतवाद्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी अन्याय अत्याचार व भ्रष्टाचार विरोधी समिती शाखा वलांडी च्या वतीने गृहमंत्री यांना तहसीलदार मार्फत निवेदन देऊन करण्यात आली.
 दिनांक 16 सप्टेंबर रोजी धारूर येथील तबलिग जमातचे अमीर साहब(प्रमूख)काझी निजामूंदीन व त्यांचे साथीदार अंबाजोगाई येथे एका अंत्यविधी कार्यासाठी जात असताना रात्री 9 वाजण्याच्या सुमारास केज तालुक्यातील होळ गावाजवळ त्यांच्या कारमध्ये तांत्रिक अडचणी, बीघाड झाल्याने ते रस्त्याच्या बाजूला थांबले होते. या वेळी काही अज्ञात समाजकंटकांनी जातीवाचक व धार्मिक शिवीगाळ करून त्यांच्यावर प्रानघातक हल्ला केला. या हल्ल्यात काझी निजामूंदीन व सोहेल तांबोळी हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.पुरोगामी महाराष्ट्रात धर्माच्या नावाने हल्ला होणे खूप चींताजनक बाब आहे या पूर्वी पुण्यात मोहसीन शेख व पालघर येथे साधूंची मॉबलिंचिंग द्वारे हत्या करण्यात आली होती.आता धारूरच्या लोकांना धर्माच्या अधारावर मारहाण करणे म्हणजे मॉबलिंचिंगचाच भाग आहे. व ही एका प्रकारे भारतीय संविधानाच्या मुळावर हल्ला करणेच आहे.जिल्ह्यात व राज्यात कायदा व व्यवस्था बिघडेल व सामाजिक वातावरण दूषित होईल या अनूषंगाने धर्माच्या नावावर हल्ला करून दहशत निर्माण करणाऱ्या  समाजकंटकावर कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी समिती तर्फे करण्यात आली.
 

 
   
   
 
 Posts
Posts
 
 
 
 
 
 
0 Comments