कै.रसिका महाविद्यालया मध्ये आंतरराष्ट्रीय वेबिनार संपन्न

देवणी / प्रतिनिधी : येथील कै. रसिका महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाच्या वतीने " रिसर्च इन केमिकल सायन्स  फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट"  या विषयावर एक दिवशीय आंतरराष्ट्रीय वेबिनार आयोजित करण्यात आला होता. या वेबिनार मध्ये रसायनशास्त्रातील तज्ञ वैज्ञानिक इटाली येथील सालेरेनो  विद्यापीठाचे प्रोफेसर डॉ. अंथेनिओ मासा, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड  येथील केमिकल सायन्स चे डायरेक्टर डॉ. भास्कर दवणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील रसायनशास्त्राचे प्राध्यापक डॉ.बापूराव शिंगाटे कै.रसिका महाविद्यालयातिल रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजयकुमार मोरे, के.एम.सी.कॉलेज  खोपोली येथील रसायनशास्त्र  विभागाचे  डॉ. शरद पंचगल्ले इत्यादी तज्ञांनी रिसर्च इन केमिकल सायन्स फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट या विषयावर सखोल चर्चा घडवून आणली. या वेबिनार मध्ये भारत, चिन,बांगलादेश, नेपाळ,भूटान,फिलिफिन्न्श,यू. ए. ई, इटली, मलेशिया,सिंगापुर, इंडोनेसीया, नयजेरीया, जपान, कोरिया, तैवान इत्यादी जगभरातील एक हजारहून अधिक लोकांनी सहभाग नोंदविला होता. या वेबिनार चे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एल. एम. वाघमारे यांनी केले.
या वेबिनार चे प्रास्ताविक कै. रसिका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रकांत जावळे यांनी केले तसेच के.एम.सी. कॉलेज खोपोलीचे प्राचार्य डॉ. एम. बी खानविलकर यांनी मनोगत व्यक्त केले.
तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्था सचिव मा. श्री. किशोर पाटील यांनी शुभेच्छा पर भाषण केले.
या आंतरराष्ट्रीय वेबिनार च्या यशस्वी ते बद्दल संस्था अध्यक्ष मा.श्री. गोविंदरावजी भोपणीकर व संस्था सचिव मा. श्री. गजानन  भोपणीकर यांनी वेबिनार साठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले.
तसेच हा वेबिनार यशस्वी होण्यासाठी प्राध्यापक अंकुश भुसावळे,प्राध्यापक अंकुश भास्कर, डॉ. पुरुषोत्तम मोरे, डॉ. सचिन चामले, डॉ. योगेश मुळे, डॉ. सुदर्शन  पेडगे इत्यादींनी परिश्रम घेतले.