शिरूर-हवेलीचे आमदार अशोकबापु पवार यांचा मराठा आरक्षणास पाठिंबा..         

पुणे / प्रतिनिधी. सुनिल ज्ञानदेव भोसले                    मराठा समाजा आरक्षणा बाबत न्यायालयात स्थगिती देण्यात आली आहे, यामुळे राज्यात ठिकठिकाणी मराठा समाजाच्या वतीने आंदोलने करण्यात येत आहे,यामुळे शिरुर- हवेलीचे लोकप्रतिनिधी आमदार.अशोकबापु पवार यांनी महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रसे पार्टीच्या वतीने मराठा आरक्षणास जाहिर पाठिंबा असल्याचे सांगितले, व त्या संदर्भात पाठिंबा असणारे पत्र हि दिले व शिरुर- हवेलीचे प्रतिनिधी आमदार.अशोकबापु पवार यांनी आपला मराठा समाजास पाठिंबा आहे असे सांगितले.              कोरोना आजाराचा  प्रादुर्भाव लक्षात घेता नागरीकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, घराबाहेर पडताना मासचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, व कोणाला काही त्रास होत असल्यास आरोग्य तपासणी करुण घ्यावी असे सांगितले.