कोरोना महामारीने प्रभावित झालेल्या आपंग निराधार व विस्थापिताना कासा संस्थेच्या वतीने धान्याचे वाटप.
-------------------------------
उदगीर / प्रतिनिधी : कोरोना महामारीच्या संकटात ग्रामिण जीवन कोलमडले आसुन आपंग,विधवा,परितक्ता,व निराधार यांच्या हाल आपेष्टा वाढल्या आहेत,यांच्या हाल आपेष्टा थांबल्या जाऊन यांचे विस्कळीत झालेले जीवन सुधारले जाऊन यांचे मनोबल वाढावे यासाठी कासा संस्थेने उदगीर तालुक्यातील नळगीर,पिंपरी, बेलसकरगा,रावनगाव, धोंडिहिप्परगा,बोरगाव,कोदळी,नावंदी,गुडसुर,मादलापुर,इत्यादि गावातल्या गरजु लाभार्थीयाची अचुक निवड करुन दि.7/10/2020 रोजी या लाभार्थीयाना प्रत्येकी पाच की.तांदूळ पाच कि.गव्हाचे पीठ,एक कि. साखर,एक कि.मुगदाळ,एक कि.तुर दाळ,आडीचशे ग्राम चहा पावडर,एक कि.सुर्यफुल तेल,दोनशे ग्रॅम ,मिरची पावडर दोनशे ग्रॅम,मीठ एक कि.डिर्टर्जन पावडर एक कि.साबण दोन नग,मास्क दोन नग,सॅनिटरी नॅपकिन दोन पाकीट,इत्यादी वस्तू प्रत्येक लाभार्थीयाना आण्णाभाऊ साठे सभागृह उदगीर येथे कार्यक्रम घेऊन वाटप करण्यात आले आहे ,हा कार्यक्रम शासनाने कोरोना महामारीस आळा घालण्यासाठी दिलेल्या नियमाची काटेकोरपणे आमल बजावणी करण्यात येऊन घेण्यात आला,या धान्य वाटप कार्यक्रमासाठी जीवन विकास सेवाभावी संस्था नळगीर या संस्थेने सहभागी होऊन परिश्रम घेतले,या कार्यक्रमाचे उद्घाटन मा.तहसीलदार प्रज्ञाताई कांबळे (उदगीर) यांचे हस्ते करण्यात येऊन आति गरजु पंचाहत्तर लाभार्थ्यांना धान्य किट्स वाटप करण्यात आले असल्याने सर्व सामान्य जनात या संस्थाचे कौतुक करण्यात येत,या कार्यक्रमास कासा संस्था जळकोट कार्यालयाचे मा.डावकरे साहेब मा.सुर्यवंशी साहेब ,जीवन विकास सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मारुती जयवंतराव गुंडीले सचिव गौरव गुंडीले सह मा.पत्रकार लक्ष्मण रणदिवे,बालाजी गुडसुरे, नंदाताई गायकवाड,सुजाता डोंगरगावकर,राजकुमार सुर्यवंशी,दादाराव गायकवाड गोविंद शिंदे इत्यादी उपस्थित होते.