ओबीसी आरक्षण चार भागात विभागण्यास राज्यस्तरीय माळी महासंघाचा विरोध

मुंबई / प्रतिनिधी : राज्यस्तरीय माळी महासंघाची नुकतीच व्हर्चुअल झूम मीटिंग माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री.भानुदास माळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.        
मुंबई उच्च न्यायालयातील वरिष्ठ विधिज्ञ अँड. शुभांगी  अ़ शेरेकर यांनी  २,आॅक्टोबर २०१७ रोजी,निवृत्त न्या.जी रोहिणी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या आयोगाबद्दल विविध प्रसार माध्यमांनी  (ET)दिलेल्या  माहितीनुसार विस्तृत माहिती देऊन मार्गदर्शन केले, सदर आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी आता पर्यंत १० वेळा मुदतवाढ दिली ३१ जुलै २०२१ ला आयोग   अहवाल सादर करेल ही अपेक्षा व्यकत केली, आणि रोहिणी आयोगाचा सर्व ओबीसी संघटनांनी अभ्यास पूर्वक विरोध  करावा असे मत व्यक्त केले.                            
       इतर मागास प्रवर्गाचे  केंद्रातील 27% आरक्षण चार भागात विभागणी मुळे अोबीसीं न मध्ये  निर्माण होणाऱ्या दुही ला राज्यस्तरीय माळी महासंघाचा विरोध असेल, असे मत राज्यस्तरीय माळी महासंघाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस अँड. दिपक माळी मुंढेकर यांनी मांडले. 
अँड.शुभांगी अ.शेरेकर आणि अँड दीपक माळी यांनी, रोहिणी आयोगाने  सूत्राना दिलेल्या माहितीनुसार ओबीसी प्रवर्गामध्ये चार गट निर्माण करण्यात येणार आहेत. ओबीसी प्रवर्गातील  १ ल्या वर्गात १६७४ जातींना २ टक्के , दुसऱ्या वर्गात ५३४ जातींना ६ टक्के तिसऱ्या वर्गात, ३२८जातींना ९ टक्के व चौथ्या वर्गात ९७ जातींना १० टक्के आरक्षण आयोगाच्या शिफारशी ने                  विभागले जाणार आहे  .केंद्रीय यादीतील २हजार६३३ ओबीसी जातींची  अशी वर्गवारी करण्या चे नियोजित आहे. 
मा.श्री.तुकाराम माळी यांनी जातनिहाय जनगणना करावी आणि त्यानंतर रोहिणी आयोग लागू करण्याबाबत विचार करावा असे परखड मत व्यक्त केले.
माळी महासंघाचे राज्य सचिव श्री. प्रवीण जांभळे चिखलीकर यांनी देशातील सर्व ओबीसी संघटनांना बरोबर घेऊन रोहिणी आयोग संदर्भात विस्तृत चर्चेसाठी राज्यस्तरीय माळी महासंघ कमेटी स्थापन करणार असल्याची माहिती दिली  त्याचबरोबर ओबीसी महामंडळामार्फत बेरोजगार ओबीसी तरुणांना 10 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळावे अशीही मागणी केली.
 राज्यस्तरीय माळी महासंघ रोहिणी आयोगाच्या विरोधात दिल्ली पर्यंत आवाज उठवणार असून देशातील सर्व ओबीसी बांधवाना सोबत घेऊन केंद्र सरकारचे खासगीकरण धोरण, ओबीसीची जाती निहाय जनगणना आदी विषयावर जनजागृती करून ओबीसीच्या संविधानात्मक हक्कासाठी लढा देणार असल्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी दिला.
यावेळी या व्हर्चुअल मीटिंग मध्ये अमरावती जिलाध्यक्ष पदी मा. श्री. प्रभाकर वानखडे यांची तर कल्याण डोंबिवली च्या अध्यक्ष पदी मा. श्री. सचिन बोराटे यांची निवड जाहीर करण्यात आली.
माळी महासंघाचे चंद्रकांत माळी, संतोष माळी, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष संदीप माळी, बाबासाहेब चपाले, नवनियुक्त कल्याण डोंबिवली जिल्हाअध्यक्ष सचिन बोराटे, नवनियुक्त अमरावती जिल्हाअध्यक्ष प्रभाकर वानखेडे,सांगली महिला जिल्हाध्यक्ष वनिता माळी,रोहित माळी, अण्णासो माळी कार्वेकर,   सुशांत माळी,उमेश माळी तसेच राज्यस्तरीय माळी महासंघाचे विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
राज्यस्तरीय माळी महासंघाचे राज्य सचिव श्री प्रविण जांभळे यांनी सर्वांचे आभार मानले.