खरीप हंगासाठी शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळणार का?
मजुराना रोजागार मिळणार का ?
दिव्यागाना मानधन देण्यात यावे , कोरोना माहामारीत आलेल्या श्रवानबाळ सं गा यो याना त्वरीत मानधन देण्यात यावे ,
बळीराजाला कर्ज देण्यास बँकांची टाळाटाळ करत असल्यामुळे , दलित हक्क समितीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष पि एन , चव्हाण यांनी केली आहे
देवणी / प्रतिनिधी : महाराष्ट्रात कोरोनाच्या महामारीमुळे आर्थिक चक्र मंदावले आहेत.शासनाने कोरोनाच्या संसर्गाला रोखण्सासाठी अनेक उपाययोजना आखत आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे.कोरोनांच्या दुसऱ्या लाटेने तर हाहाकार माजवला आहे.कित्येक जणांना आपल्या प्राणांना मुखावे लागले आहे.
देशाचा पोशिंदा म्हणून बळीराजा आपल्या शेतीच्या मशागती मध्ये सध्या मशगुल आहे.यावर्षी हवामान खात्याच्या अंदाजानुसार चांगला पाऊस पडन्यांची शक्यता आहे.शेतकरी आपल्या शेतात पेरणीपुर्व कामे करताना दिसत आहे.यंदा महागाईमुळे खत,बी-बीयाणे महाग झाले आहेत.कोरोनामुळे शेतात काम करणाऱ्या मजुरांनी देखील आपली मजुरी वाढवली आहे.अनेक संकटाचा सामना करावा लागणार आहे.शेतकरी सध्या चिंताग्रस्त आहे.पेरणीसाठी लागणारा पैसा कोठुन आण्याचा हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभा आहे.बँका यावर्षी शेतकऱ्यांना पिक कर्ज देईल का? अजुनही शेतकऱ्यांच्या नावे कर्ज माफ होऊन सुध्दा कर्ज माफी झाल्याचे सावळागोदळ आहे.कर्जाचा बोजा सात बारावरुन कमी करण्यासाठी शेतकरी बँकांचे खेटेमारत आहे.शासनाने तर संपूर्ण कर्ज माफी केली आहे.काही शेतकऱ्यांना या समस्यांचा सामना करावा लागात आहे.नवीन पिक कर्ज घेण्यासाठी बँकाचे नहारकत प्रमाणपञ लागते आहे.कर्ज माफीची घोषणा होऊन देखील काही शेतकऱ्यांना यांचा लाभ घेत येत नाही.कोरोणाच्या महामारीमुळे कर्ज देण्यासाठी बँका उदासिन आहेत.शेतकऱ्यांना आपल्या शेतात पेरण्यासाठी जो आर्थिक खर्च येतो तो खर्च कोठुन आणावा हा मोठा प्रश्न आहे.बळीराजाला एकरी नांगरणी पासुन काढणी पर्यंत अंदाजे २०,०००/ रुपये खर्च येत आहे.हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस पाणी चांगले आहे.यावर्षी तरी चांगले पिक येवुन उत्पन्न चांगले होईल अशी आक्षेप बळीराज करीत आहे.लॉकडाऊन,कोरोना,अतिवृष्टी,शेतकरी विरोधी कायदे,अशा अनेक संकटाचा समान यावेळी बळीराजाला करावा लागणार आहे.यातुनही मार्ग काढुन बळीराजा पेरणीसाठी सज्ज झाला आहे.
कोरोनाची महामारी,लॉकडाऊन,खतांचे,बि-बियाणे,फवारणी औषधे महाग झाल्यामुळे शेती करणे परवडणारे नाही.अतिवृष्टी,महापुर,यामुळे गेल्यावर्षी हातातोंडाला आलेले पिक वाय गेले यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.शेतात उत्पन्न कमी आणि उत्पादन करण्यासाठी येणार खर्च यात मोठी तफावत झाली आहे.शेतकऱ्यांना कधी आस्मानी तर कधी सुल्लतानी संकटांना सामोरे जावे लागत आहे.शेती व्यवसाय करणे आता महाग झाले आहे ,
लातुर जिल्ह्यातील गोरगरीब शेतात मजुरी करण्याचं काय प्रश्न आहेत हेच कळत नाही म्हणून मजूराना , दिव्यागाना , श्रवानबाळ योजनेच्या कोरोना मध्ये आलेल्या मानधन लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे अन्यथा दलीत हक्क समितीच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष पि एन चव्हाण , तसेच दलित हक्क कमिटिचे लातूर जिल्हाध्यक्ष रणदिवे लक्ष्मण यांच्या वतीने न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे
0 Comments