होऊनच जाऊ दे एकदा हिंदू राष्ट्र..!
होऊनच जाऊ दे एकदा हिंदू राष्ट्र !
मूर्खांची हौस फिटून जाऊ द्या...
ढोंगी साधू आणि विकृत साध्वी होऊन जाऊ द्या यांचे मालक...
तीच लायकी यांची आहे.
येऊ द्या मनुस्मृतीचा कायदा पुन्हा एकदाचा...
फेसबुकवरच्या चौकीदार बायकांना लागू होऊ द्या स्मृतीचा कायदा...
येऊ द्या बंदी त्यांच्या आधुनिक वेशभूषेवर,
होऊ द्या सक्ती नऊवारी नेसून चोवीस तास घरात बसण्याची,
परपुरूषाला अंगठाही न दिसू देण्याची.
देतील त्या नोकर्यांचे राजीनामे..।
त्यात काय? हिंदू राष्ट्र महत्त्वाचे !
चौकीदार तरूणांना करा सक्ती गुरूदक्षिणेची...
घेऊ द्या अंगठा कापून... ते तयार आहेत...
त्यांना कधी एकदा ती गुलामी येते असं झालंय... तर येऊ द्या एकदा.
वर्णाश्रमाप्रमाणे करू द्या नोकरी...
ब्राह्मणांच्या मुलांनी सेवाक्षेत्रात (आय टी हेही सेवाक्षेत्र) काम नाही करायचं..
ते शूद्रासाठी राखीव सोडायचं..
आणि पळीपंचपात्र घेऊन करायची भिक्षुकीच, प्रवचनं द्यायची... धर्म शिकवायचा ..
क्षत्रियांच्या मुलांनी फक्त सीमेवर जाऊन लढायचं.. डाॅक्टर, इंजिनीअर, प्राध्यापक, वकील व्हायचं नाही.
वैश्याच्या मुलांनी फक्त गल्ला सांभाळायचा...त्यांनीही डाॅक्टर, इंजिनीअर, प्राध्यापक, वकील व्हायचं नाही..
ब्राह्मणांनी परदेशात जायचं नाही... समुद्रबंदी पाळायची ! समुद्र ओलांडायचा नाही... मांसाहार करायचा नाही.. मदीरा तर वर्ज्यच.
होऊनच जाऊ द्या एकदा हिंदुराष्ट्र !
करा साध्वीला राष्ट्रप्रमुख... अरे हो, पण तिला होता येणार नाही
कारण मनुस्मृतीच्या कायद्यानुसार साध्वीही शूद्रच !
तिला नाही राज्य करण्याचा अधिकारच !
करा एखाद्या बाईबाज बुवाला राष्ट्रप्रमुख !
(सध्याचा नाही, वेगळा.. हा तर शूद्र )
आणि होऊनच जाऊ द्या एकदा हिंदुराष्ट्र !
बिनधास्त म्हणतात, या देशात हुकूमशाहीच पाहिजे!
आणाच हुकूमशाही !
याच समर्थकांना, बेवकूफांना जेव्हा छळछावण्यात नेलं जाईल,
आटेदाल का भाव तेव्हा माहिती होईल..
आमचं काय ? आम्ही तर तयारच आहोत
होऊनच जाऊ द्या एकदा.
आणाच हुकूमशाही ..
अंधभक्तांची, मतीमंदांची, बुद्धिमंदाची नादान बकबक..
किती दिवस ऐकायची? आणाच एकदा हिंदूराष्ट्र, कायमचा निकाल तरी लागून जाईल.
नामदेव ते तुकाराम, आगरकर ते राजा राममोहन राॅय सगळे व्यर्थ गेले असतील तर आता हिंदू राष्ट्र हा शेवटचा जालीम उपायच यांना वठणीवर आणू शकतो.
आणि फरक काय पडतो? आज राजकीय गुलाम आहेत ; उद्या धार्मिक गुलाम होतील. गुलामीच्या यांच्या सगळ्या हौशी पूर्ण झाल्या पाहीजेत. होऊनच जाऊ द्या.
- विश्र्वंभर चौधरी
0 Comments