राहुरी तालुका / प्रतिनिधी (शेख युनूस) : राज्य मंत्री प्राजक्त तन पुरे यांच्या प्रत्नांमुळे व सहकार्याने राहुरी तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये कोरोना लसीकरण हे योग्य प्रकारे नियोजनबध्द पार पडत आहे. वावराथ जांभळी येथे राज्य मंत्री प्राजक्त तन पुरे यांच्या अध्क्षतेखाली व पंचायत समिती सभपती सौ. बेबीताई सोडणर यांनी डोस घेऊन समस्थ ग्रामस्थ व भगिनी यांना कोरोना विषयी माहिती दिली. कोरोना आजार हा गंभीर असून त्या आजारापासून सं रक्षण होण्यासाठी लस, मास्क, सोशल डिस्टेंस याची माहिती सरपंच बाचकर ज्ञानेश्र्वर यांनी सविस्तर माहिती दिली. कोरोणा विषयी जनजागृती केली. आणासो.बाच कर, आणसो. सोडनर , नाना बाचकर, तलाठी कविता गर्धे, ग्रामसेवक योगेश चंद, अंगणवाडी सेविका,मदतनीस शिक्षक, आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कॉरोना लसीकरण हि सुरळीत योग्य प्रकारे नियोजनबध्द पार पाडण्यात आली. येथील सरपंच ज्ञानेश्र्वर बा चकर यांनी आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले. आणि ग्रामस्थ उपस्थित बंधू, भगीनी , ग्रामपंचायत विभाग कर्मचारी यांना मास्क,सोशल डीस स्टेंस, सेनिटायझेर वापरा आणि घरी रहा, सुरक्षित राहा.. असे आव्हाहन केले.
0 Comments