जिल्ह्यात लॉकडाऊन बाबतचे निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत
- जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.
31 मे रोजीच्या आदेशानुसार 15 जून च्या सकाळी 7 पर्यंत सर्व दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सुरू राहतील
लातूर, दि.3(जिमाका):- ब्रेक डी चेन अंतर्गत जिल्ह्यात कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिनांक 31 मे 2021 रोजी देण्यात आलेले लॉकडाउन बाबतचे निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत. आदेशामध्ये नमूद केल्याप्रमाणे सर्व दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील. तसेच शनिवार व रविवार हे दोन दिवस विकेंड लॉकडाउन राहील.
तरी लातूर जिल्ह्यात उपरोक्त आदेशाप्रमाणे सर्व दुकाने सुरू राहणार असल्याने जिल्ह्यातील नागरिकांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आदेशा शिवाय इतर कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केली आहे.
********
0 Comments