ज्ञानमंदिर सक्षम करण्यासाठी स्वकष्टाच्या समिधा अर्पण करा 
- जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे यांची गावकऱ्यांना साद 
 
लातूर / प्रतिनिधी : बाला उपक्रमातून जिल्हा परिषदेच्या शाळांचे रुप बदलत आहे.नागरिकांनी प्रत्येक गावी पुढाकार घेऊन गावाचे ज्ञानमंदिर सक्षम बनवावे.त्यासाठी स्वकष्टाच्या समिधा अर्पण कराव्यात,असे आवाहन जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी केले.
   देवणी तालुक्यातील तळेगाव व नगतीर्थवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या उपक्रमाची पाहणी केल्यानंतर अध्यक्ष केंद्रे बोलत होते.पाहणी करून त्यांनी या शाळेचे कौतुक केले.
   बाला हा उपक्रम राबविणारी लातूर ही राज्यातील एकमेव जिल्हा परिषद आहे.भौतिक बाबींचा शिक्षणात वापर ही मुळ संकल्पना असून याबरोबरच शाळांचे रूप बदलले जात आहे.ग्रामीण भागात असणाऱ्या जिल्हा परिषद शाळा ही गावाची ज्ञानमंदिरे असून या ज्ञानमंदिराच्या उद्धारासाठी गावोगावी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे.जिल्हा परिषदेकडील शेष फंडातून निधी उपलब्ध  करून देण्यात आला असली तरी तो तोकडा आहे.
लाॕकडाऊनच्या काळातही अनेक गावांमधून ग्रामस्थांनी उस्फूर्त पुढाकार घेत शाळांसाठी लोकसहभागातून बाला उपक्रम राबविला आहे. जिल्हाभरातून या योजनेला मोठा प्रतिसाद मिळतो आहे.या मंदिरात ज्ञानदानाचा यज्ञ चालतो.तो अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी गावकऱ्यांनी स्वकष्टाच्या समिधा अर्पण कराव्यात.आपली पुढची पिढी सक्षम करण्यासाठी मदतीचे हात पुढे करावेत 
असेही जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी सांगितले .
  यावेळी उपसभापती शंकरराव पाटील तळेगावकर,गटविकास अधिकारी नितीन राऊत,
जि.प,सभापती गोविंदराव चिलकुरे,जि.प.सदस्य प्रशांत पाटील,भाजपाचे तालुकाध्यक्ष काशिनाथ गरीबे,सरपंच सदाशिव पाटील,बबनराव मुदाळे ,राज गुनाले,रामलिंग शेरे,अमित पाटील  आदी उपस्थित होते.
-------------------------------
बाला उपक्रमा साठी जनतेला अहवान
मदत करणारे हात पवित्रच..
   हरिनाम सप्ताह व अन्य धार्मिक कार्ये  लोक सहभागातून होतात ही अभिमानाची बाब आहे.
आपली पुढची पिढी ज्या ज्ञानमंदिरात घडते त्या ज्ञानमंदिरांसाठी पुढे येणारे हात हे प्रार्थनेसाठी जोडलेल्या हाताईतकेच पवित्र असल्याचे राहुल केंद्रे यांनी सांगितले त्या मुले जनतेने लोकसहभाग द्यवा.