औक्सिजन मिळविण्यासाठी एक तरी झाड लावावे म्हणून लग्नाच्या वाढदिवसानिमित्त केक न कापता साध्या पध्दतीने वृक्ष स्वतःच्या शेतात लावून राष्ट्रवादीचे अनिल कांबळे यांनी केला लग्नाचा वाढदिवस साजरा
देवणी / प्रतिनिधी : झाडे लावा झाडे जगवा,पर्यावरण संतुलित ठेवा राजकीय सामाजिक जान असाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे लातूर जिल्हा सरचिटनिस अनिल कांबळे देवणी खु येथील रहिवासी असणारे आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या माजी संरपच सौ चंद्रकला अनिल कांबळे व अनिल साधुराम कांबळे यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्ययासह देशात कोरोणाने थैमान घातले असुन देशभरात अनेक कोरोना रुग्णालवर उपचार सुरू आहेत.या प्रचंड वाढलेल्या संख्येमुळे शासकीय रूग्णालय व खाजगी रूग्णालय भरगच्च भरलेली होती.या कोरोना बाधीत रुग्णांना रूग्णालयात बेड पण मिळत नव्हते. औक्सिजन मिळत नव्हता,व्हेटिलेटर नाही,रेमडिसीव्हर इंजेक्शन पण मिळत नव्हते.अशा भयावह अवस्था महाराष्ट्रात पहायला मिळत होती.औक्सिजन अभावी अनेक कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.आपल्याला नैसर्गिक अॉक्सिजन पाहिजे असेल कोरोना बांधित रुग्णांने व सर्व जनतेने एक तरी झाड लावावे व त्यांचे संगोपन करावे. झाडे लावा... झाडे जगवा हा शासनाचा नियम आता कागदावरच झाला असुन अनेक ठिकाणी झाडांची अवैध कतल होत असताना सुध्दा शासन याकडे दुर्लक्ष करत आहे.आपल्या अॉक्सिजन जर नैसर्गिक घ्याययचा असेल तर झाडे लावा.. हवा शुध्द ठेवा वृक्षसंवर्धन हि काळाची गरज बनली असुन कोरोना बाधित रुग्णानीच नसुन सर्वानी झाडे लावावीत एक झाड आपल्याला आयुष्यभर नाही तर पिढ्यांन पिढ्या मोफत स्वच्छ औक्सिजन देतात.झाडे लावल्यामुळे आपल्याला कोरोनाच नाही तर स्वच्छ,सुंदर,आरोग्यदायी जीवन जगता येते.विनामुल्य भरपूर औक्सिजन व पर्यावरण संवर्धन यासाठी प्रत्येक व्यक्तीने झाडे लावावीत वृक्ष संवर्धन हि काळाची गरज आहे.प्रत्येकजण जास्तीत जास्त औक्सिजन तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत.कित्येक टन अॉक्सिजन सिलेंडर्स घेतले जात आहेत.निसर्गपासुन जबरदस्तीने घेत असलेल्या या औक्सिजनची भरपाई आपण कशी करणार? कोरोनाने आपल्याला अॉक्सिजनचे महत्त्व पटवुन दिले आहे.नियमित कोणत्याही ञासाविना फुकट मिळणाऱ्या अॉक्सिजनसाठी आटापिटा करावा लागत आहे.स्वस्थ व निरोगी जीवन जगण्यासाठी आरोग्य उत्तम राहण्यासाठी व शुध्द हवा मिळविण्यासाठी आपल्या परिसरात शेती बागेत झाडे लावावीत व आपल्याला अॉक्सिजन मिळेल या वाढदिवसाच्या निमित्ताने एक आपल्या स्वतःच्या शेतात एक वृक्ष लावून लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यात आले.
0 Comments