कोविडमुळे पालक गमावलेल्या 0 ते 18 वयोगटातील अनाथ बालकांना महिला व बालविकास विभागाचा मदतीचा हात
नांदेड / प्रतिनिधी ; कोविड-19 (कोरोना) परिस्थितीत इतर अनेक समस्यांबरोबर बालकांच्या समस्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या बालकांचे आरोग्य, संरक्षण, बालविवाह यासारख्या समस्यांसोबतच कोविड-19 मुळे दोन्ही पालकांच्या मृत्यू मुळे मुले अनाथ होण्याची गंभीर समस्या समोर येत आहे.
कोविड-19 च्या कारणाने एक पालक अथवा दोन्ही पालक गमावल्यामुळे अनाथ झालेली बालके आपल्या गावामध्ये असल्यास/आढळून आल्यास 1098 या हेल्पलाईन वर संपर्क साधावा अथवा प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बाल कल्याण समिती, व पोलीस यंत्रणेशी त्वरित संपर्क साधून या बालकांना संबंधित यंत्रणेच्या ताब्यात द्यावे. त्याची शासनामार्फत योग्य ती काळजी घेण्यात येईल.
-अधिक माहिती करीता-
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष,नांदेड
पत्ता:- शास्त्री नगर नांदेड भाग्य नगर कमानीच्या आत

0 Comments