भूषणसिंह राजे होळकर यांनी घेतले आरेवाडीच्या बिरोबाचे दर्शन

सोलापूर / प्रतिनिधी : होळकर राजघराण्याचे वारसदार भूषणसिंह राजे होळकर यांनी काल (रविवारी २७ जून) आरेवाडी येथील बिरोबा देवाचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर आणि परिसर पाहून त्यांनी धन्य झालो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
धनगर समाजाचे कुलदैवत असलेल्या आरेवाडी येथील बिरोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी होळकर घराण्याचे राजपुत्र भूषणसिंह राजे होळकर आले होते. यावेळी त्यांनी बिरोबा देवाचे दर्शन घेवून मंदिर परिसराची पाहणी केली. सुसज्ज व देखणे मंदिर, प्रशस्त परिसर आणि शांततामय व भक्तिमय वातावरण पाहून ते भारावून गेले. तसेच धुपारतीच्या वेळी ढोल कैताळाचा आवाज ऐकुन ते मंत्रमुग्ध झाले. 

       याप्रसंगी श्री बिरोबा देवस्थान ट्रस्ट व आरेवाडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ व फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी देवस्थानचे पदाधिकारी व आरेवाडी गावातील प्रतिष्ठित नागरिक व युवक उपस्थित होते.

श्री. बिरोबा स्टडी सेंटरला सदिच्छा भेट
मायभूमी आरेवाडी ग्रुपच्या सुसंवाद व योगदानातून उभारलेल्या बिरोबा  स्टडी सेंटरला  राजे भूषणसिंह होळकर यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी ते म्हणाले, हा स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राचा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून अशी अभ्यास केंद्रे गावागावात सुरू व्हायला पाहिजेत. हे केंद्र शांततामय व प्रशस्त ठिकाणी सुरू केले आहे. येथे विस्ताराला मोठी संधी आहे. त्यामुळे हे केंद्र एक आदर्श असे राज्यस्तरीय केंद्र म्हणून विस्तारावे, अशी अपेक्षा देखील त्यांनी यावेळी बोलून दाखविली. यासाठी मी देखील शक्य ती मदत व सहकार्य करेन, असा शब्द देखील त्यांनी यावेळी दिला.भूषणसिंह राजे होळकर यांनी घेतले आरेवाडीच्या बिरोबाचे दर्शन

होळकर राजघराण्याचे वारसदार भूषणसिंह राजे होळकर यांनी काल (रविवारी २७ जून) आरेवाडी येथील बिरोबा देवाचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर आणि परिसर पाहून त्यांनी धन्य झालो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

धनगर समाजाचे कुलदैवत असलेल्या आरेवाडी येथील बिरोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी होळकर घराण्याचे राजपुत्र भूषणसिंह राजे होळकर आले होते. यावेळी त्यांनी बिरोबा देवाचे दर्शन घेवून मंदिर परिसराची पाहणी केली. सुसज्ज व देखणे मंदिर, प्रशस्त परिसर आणि शांततामय व भक्तिमय वातावरण पाहून ते भारावून गेले. तसेच धुपारतीच्या वेळी ढोल कैताळाचा आवाज ऐकुन ते मंत्रमुग्ध झाले. 

       याप्रसंगी श्री बिरोबा देवस्थान ट्रस्ट व आरेवाडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ व फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी देवस्थानचे पदाधिकारी व आरेवाडी गावातील प्रतिष्ठित नागरिक व युवक उपस्थित होते.

श्री. बिरोबा स्टडी सेंटरला सदिच्छा भेट
मायभूमी आरेवाडी ग्रुपच्या सुसंवाद व योगदानातून उभारलेल्या बिरोबा  स्टडी सेंटरला  राजे भूषणसिंह होळकर यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी ते म्हणाले, हा स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राचा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून अशी अभ्यास केंद्रे गावागावात सुरू व्हायला पाहिजेत. हे केंद्र शांततामय व प्रशस्त ठिकाणी सुरू केले आहे. येथे विस्ताराला मोठी संधी आहे. त्यामुळे हे केंद्र एक आदर्श असे राज्यस्तरीय केंद्र म्हणून विस्तारावे, अशी अपेक्षा देखील त्यांनी यावेळी बोलून दाखविली. यासाठी मी देखील शक्य ती मदत व सहकार्य करेन, असा शब्द देखील त्यांनी यावेळी दिला.