जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील व राज्यमंत्री ना.संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर जिल्ह्यातील नेते पंडितराव धुमाळ यांचा पक्षप्रवेश 

लातूर / प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील व राज्यमंत्री ना. संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर जिल्ह्यातील नेते पंडितराव धुमाळ यांचा पक्षप्रवेश आज प्रदेश कार्यालयात पार पडला. याप्रसंगी पक्षाचे लातूर जिल्हाध्यक्ष आमदार बाबासाहेब पाटील, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील-नागराळकर, राष्ट्रीय अल्पसंख्याक अध्यक्ष शब्बीर विद्रोही, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, कार्याध्यक्ष बबन भोसले,लातूर माजी जिल्हाध्यक्ष डी.एन.शेळके राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव मनोज कन्नाडे, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी देवणी तालुकाध्यक्ष प्रा.डॉ.अनिल इंगोले सर, राष्ट्रवादी काँगेस पार्टी शिरूरअनंतपाळ तालुकाध्यक्ष श्री.विठ्ठल पाटील, निलंगा तालुका अध्यक्ष मा.श्री.दिलीप पाटील, इस्माईल लदाफ, नंदू तांबोळकर,उपस्थित होते.

लोकांमधील कार्यकर्ते जेव्हा आपल्या पक्षात प्रवेश करतात तेव्हा आम्हाला मनापासून आनंद होतो. लातूर जिल्ह्याकडून राजकीय संस्कृती कशी सांभाळावी हे आम्ही शिकलो आहोत. त्यामुळे या जिल्ह्याकडे आमचा विशेष ओढा आहे. निलंगा मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद थोडी कमी पडत होती. ही ताकद वाढविण्यासाठी आता सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचे आहे. धुमाळ यांच्या येण्याने या ताकदीत भर पडली आहे असे मत जयंत पाटील यांनी यावेळी मांडले. तसेच आदरणीय पवार साहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन अनेक लोक पक्षात येण्यासाठी इच्छुक आहेत. यासोबतच जनमानसाचा ओढा राष्ट्रवादीकडे आहे. पक्ष वाढविणे सोपे असते पण पक्षात आलेल्यांना योग्य सन्मान देणं ही मोठी जबाबदारी असते. पक्षात आलेल्यांना हा सन्मान नक्कीच दिला जाईल, असा विश्वास ना. जयंत पाटील यांनी दिला.  

ना. संजय बनसोडे यांनीही पक्षप्रवेश केलेल्या सर्व मान्यवरांचे पक्षात स्वागत केले. निलांगा मतदारसंघात पक्ष संघटना बळकट करण्याची व येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळवून देण्याची जबाबदारी आता धुमाळ यांच्यावर आहे. यासाठी बूथ कमिटी रचनेवर लक्ष दिलं तर हे यश नक्कीच आपलं आहे, असे ना. संजय बनसोडे यांनी सांगितले. 

यावेळी प्रविण सुरवसे, अतुल पाटील, फारुख देशमुख, अनिलकुमार देवंग्रे, वैभव म्हेत्रे, बालाजी लवे, सचिने दोडके, युसुफ महेबूबसाब सय्यद, गुणवंतराव जाधव, संजय सावकार, बालाजीराव पाटील, सुधीर धुमाळ, विशाल धुमाळ, बळीराम माने, लतीफ पटेल यांनीही पक्षात प्रवेश केला.