कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्याचे फायदे, नियम, अटी,शर्थी व कर्ज थकित न ठेवता नियमीत कर्ज परतफेडीचे ग्रामस्थांना बॅन्केकडून माहिती


उदगीर / प्रतिनिधी : आज दि. 7.7.21 रोजी State Bank of India उदगीर ब्रॅन्च चे कर्ज विभागाचे कार्यशील मॅनेजर मा.गवळी साहेब व त्यांचे बॅन्क सहकारी यांनी तालुक्यातील शिरोळ, जानापूर असा दौरा करून सर्व कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्याचे फायदे, नियम, अटी,शर्थी व कर्ज थकित न ठेवता नियमीत कर्ज परतफेडीचे ग्रामस्थांना  बॅन्केकडून संपूर्ण कर्ज परतफेडीबद्दल  ग्रामपंचायतीमार्फत गावाला विकासात्मक कार्यात दिलं जाणारं योगदान या व अशा सर्व बाबतीत शेतकऱ्यांना व समस्त ग्रामस्थांना अतिशय सुरेख अशी  माहिती त्यांनी  दिली...या वेळेला शिरोळ येथील  सरपंच प्रतीनिधी रामदास काळगापुरे, पत्रकार धनराज भोसले , सदस्य संदीप जाधव, उपप्राचार्य आप्पाराव काळगापुरे, गंगाधर बिरादार, उमेश कनाडे, आंबादास बिरादार, गिरीधर जावरे, राम हल्लाळे, शिवकुमार हल्लाळे, हणमंतराव मंदे, शिवाजी जाधव, हणमंत शिवनगे, अहेमद पटेल, मोहम्मद पटेल, भानुदास भदाडे, दगडू भदाडे, चंद्रकांत म्हेत्रे जानापूरचे महादेव चिमेगावे व शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते....या वेळी मॅनेजर गवळी साहेबांनी सर्व शेतकऱ्यांना पीककर्जाचे फार्म देवून कार्यक्रमाचा समारोप केला.