"आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी जे lockdown केले आहे त्याचे आपण सर्वांनी पालन करने महत्त्वाचे आहे.
परंतु काही लोक आपल्या देशात असे आहेत की ज्यांना दररोज काम केल्या शिवाय अन्न मिळत नाही, शेतीत राबल्या शिवाय खायला मिळत नाही, रोजंदारीवर काम करणारे , शेतीत कामकरणारे मजूर असतील त्यांनी काय करायचे ? त्याच बरोबर हातावर पोट आसणा-यांनी करायचं काय? आणी खायचे काय ? सरकारने असे करायला पाहिजे होते की सर्व कंपन्या असतील किंवा अन्य ठिकाणी काम करणारे मजुरांचे कमीत कमी दोन महिन्याचे पगार करून त्यांना आदेश जारी करायचे होते, पण असे काय होऊ नये की कोरोनाचा लाँकडाऊन;पोटाचाही लाँकडाऊन..!! लांबच पण आपल्या देशात उपासमार होऊ नये, अन्यथा उपासमारीने मरण्याची वेळ येवू नये..!! सर्वाना दोन महिन्याचे रेशन देऊ केले असते तर?अनेक अश्या समस्या आहेत त्या आज आपल्या देशात सोडवू शकू आणी त्यामुळे कोरोनाशी दोन हात करता येईल..!!!

0 Comments