*कोरोना इफेक्ट*

*राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी 1954 साली लिहिलेल्या ओळी*

चहूबाजूंनी केली घाण
त्यात जंतू झाले निर्माण
त्यातून रोगाच्या साथी
भिन्न भिन्न वाढ घेती

नाही नेमाचा आचार
शुद्ध नाही आहार विहार
अशुद्ध पाणी हवा संहार
करिती जनाचा

काही खाणे कोठेही खाणे
कधी झोपणे कधी उठणे
सप्तही धातू कोपती याने
रोग रूपाने फळा येती

कशास काही नियम नाही
कोण रोगी कोठे थुंकला
कोठे जेवला,संसर्गी आला
गोंधळ झाला सर्वत्र

*मद्य मांसाहार करिती कोणी*
*नाना प्राणी खाती मारोनी*
*सकळ रोग जाती लागोनी*   *सांसर्गिक आदि*

उत्तम रक्ताचे असावे शरीर
अन्नही उत्तम खावे सुंदर
बाष्कळ खाता मेंदू इंद्रियांवर बाष्कळ पणा येईल

भोजन म्हणजे भूमातेचा प्रसाद
समजोणी घ्यावे सुखे स्वाद
ज्यात शेतकऱ्याचे कष्ट विशद
ते अन्न सेवावे सेवेस्तव

गोदुध नित्य सेवन करिता
काया कल्पची होय तत्वतः
शक्ती चपळता बुद्धिमत्ता
आरोग्य होता नित्य राही

*आरोग्य चांगले राहण्यासाठी  मानवाने दिनचर्येत बदल केल्यास चांगला आहार,चांगला,विचार,व विहार  केल्यास व स्वच्छ खाणे , पिणे,राहणे,योग्य वेळेवर सर्व दिनचर्या केल्यास सुख प्राप्ती होते.प्रतिकार शक्ती वाढते.*

*-- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज*
     *ग्रामगीता