भारतीय राज्य घटनेचा आदर करून समताधिष्ठित समाज व्यवस्था निर्माण करू पाहणारे - पो. नाईक अक्रम शेख
--- गिरीधर गायकवाड
----------------------------------
देवणी :  भारतीय राज्य घटनेचा आदर करून न्याय, समता ,बंधुता , या निती मूल्यावर आधारित  समताधिष्ठित समज व्यवस्था निर्माण करू पाहणारे  पोलिस नाईक  अक्रम शेख  एक आदर्श व्यक्तीमत्त्व ठरले आहे त्यांच्या कार्याचा आढावा घेन्याचा हा लहानसा प्रयत्न
अक्रम शमशोदिन शेख यांचा जन्म 1975 साली सर्वसामान्य शेतकरी कुटूंबात झाला घरची परिस्थिती अत्यंत बिकट हलाकीची .परंतु आपला मुलगा शिकला पाहिजे म्हणून अनेक परिस्थितीवर मात करीत त्यांच्या वडिलांनी शिक्षणाशिवाय माणसाची प्रगती होऊ शकत नाही म्हणूनअक्रम यांना शिकवायचेच असा  चंग वडिलांनी बांधला  त्यांना प्राथमिक शिक्षणासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाढवणा येथे प्रवेश दिला अक्रम शेख हे   लहानपणापासून चाणाक्ष बुद्धीचे  आपल्या बुद्धिकौशल्या च्या जोरावर अक्रम शेख यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावांतील  यशवंत विद्यालय वाढवणा येथे पूर्ण केले  घरची परिस्थिती बेताचीच असताना घरातील भावा बहिणीची जबाबदारी अक्रम शेख यांच्यावर होती आईवडील यांना आर्थिक हातभार लावण्यासाठी नोकरी करणे गरजेचे होते        अक्रम शेख यांनी आपल्या अभ्यासासोबत खेळातही प्राविण्य दाखवत त्यांनी व्हॉलीबॉल या खेळात  राज्यपातळीवर आपले आपल्या विद्यालयाचे नाव सुवर्ण अक्षरात लिहले  हया खेळाचा फायदा अक्रम शेख यांना झाला आपल्या पुतण्याच्या कर्तुत्वावर खुश होऊन औरंगाबाद येथे एसीबी मध्ये निवृत्त उप्पर पोलिस अधीक्षक  एच एम शेख  यांच्या आशीर्वादाने  अक्रम शेख हे1995 साली पोलीस खात्यात रुजू झाले एक वर्ष नागपूर  येथे व उदगीर मुरुड जळकोटया ठिकाणी असे एकूण पंचवीस वर्षे पोलिस ट्रॅफिक पोलीस व गोपनीय शाखेत आपली सेवा बजावली आहे सेवा बजावित आहेत  पोलिस खात्यात नोकरी करीत असताना आपली काहीतरीसामाजिक बांधिलकी आहे म्हणून त्यांनी गोपनीय शाखेत काम करीत असताना गोरगरीब विद्यार्थ्यांना पासपोर्ट व वाहन परवाना साठी वर्तुनुक प्रमाणपत्र निशुल्क देऊन अक्रम शेख यांनी आपली सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले आहे व सातत्याने करीत आहेत  अक्रम शेख यांचा स्वभाव मनमिळाऊ असल्यामुळे सर्वांना हवे  हवेसे वाटतात सामाजिक समता प्रस्थापित करणार कर्तुत्वान व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते सध्या गोपनीय शाखेची जबाबदारी सांभाळत असताना देवणी तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ दिला नाही  तालुक्यात सतत समता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करीत असतात 
भारतीय राज्य घटनेचा आदर करून समताधिष्ठित  समाजव्यवस्था निर्माण करू पाहणारे पोलिस नाईक अक्रम शेख यांच्या सारखे समाजात खुप कमी लोक आहेत म्हणून तर आशा व्यक्तीमत्वाची कदर होणे गरजेचे आहे. आशा विचारधारेचा बि.टि.व्हि.न्यूज महाराष्ट्र सदैव गौरव करणारी वाहिनी आहे.