*महात्मा_बसवेश्वर*.
महात्मा बसवेश्वर हे १२ व्या शतकातील भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय व सामाजिक जीवनातील युगपुरुष, एक महान तत्त्वज्ञानी, समाजप्रबोधक, प्रसिद्ध कवी आणि धर्म सुधारक होते. महात्मा बसवेश्वरांनी जातीपातींच्या भिंती गाडून तत्कालीन समाजव्यवस्थेला एक वेगळीच ओळख दिली होती. त्यांनी शोषणविरोधी, भेदभावविरोधी, जातीभेदाविरोधी, श्रेष्ठ-कनिष्ठ विरोधी लढाई नुसती लढली नाही तर ती यशस्वी करून दाखवली. महात्म बसवेश्वरांनी वर्णभेद, जातीभेद नुसतेच नाकारले नाही तर त्यावर त्यांनी सडकून टीकाही केली.
महात्मा बसवेश्वरांच्या काळात समाजव्यवस्थेत स्त्रीला शुद्र, बहिष्कृत समजले जात असे. स्त्रियांवर अन्याय होत होता, म्हणून त्यांनी स्त्रियांसाठी मोठे भरीव कार्य केले. स्त्रियांना मत स्वातंत्र्याचा अधिकार दिला. त्यांना धार्मिक आणि आध्यात्मिक हक्क दिले.
महात्मा बसवेश्वर यांनी समाजातील गरिबी, विषमता दूर करून आर्थिक समृद्धता निर्माण करण्यासाठी त्यांनी समाजाला “कायक वे कैलास” आणि “दासोह” अश्या दोन क्रांतिकारक संकल्पना दिल्या.
मनापासून केलेले प्रत्येक काम हीच खरी शिव उपासना हे त्यांच्या कायक वे कैलास सिद्धांताचे सार होय. शारीरिक श्रम वा व्यवसाय हाच स्वर्ग (कैलास) आहे. कोणत्याही प्रकारचे शारीरिक श्रम हे हीन दर्जाचे नाहीत, असे सांगून त्यांनी श्रमप्रतिष्ठा वाढविली. कायक हे केवळ पैशासाठी सांगितलेले नाही. तसेच ते कर्मसिद्धांतावर आधारलेले नसून त्यात व्यक्तीला व्यवसायस्वातंत्र्य देण्यात आलेले आहे.
श्रमप्रतिष्ठेबरोबरच गरजेनुसार संपत्तीची विभागणी करावी दासोह सिद्धांतात आपण कमावलेले धन केवळ स्वतः पुरते न वापरता त्याचा समाजासाठी उपयोग करण्याची संकल्पना त्यांनी मांडली.
बसवेश्वरांच्या उपदेशामुळे वेगवेगळ्या व्यवसायांना, विशेषतः ग्रामोद्योगांना, प्रोत्साहन मिळाले आणि सर्व व्यावसायिकांमध्ये समभाव निर्माण झाला.
शिवानुभवमंटप म्हणजेच अनुभवमंटप ही संस्था हे त्या काळातील पहिले लोकशाहीचे सभागृह होते. वेगवेगळ्या जातींतील व व्यवसायांतील भक्त येथे एकत्र जमत आणि विविध विषयांवर चर्चा करीत असत. ही चर्चा लयबद्ध गद्यातून होत असे. मंटपातील चर्चेच्या माध्यमातून त्यांनी लोकांमध्ये जागृती केली. येथे परिसंवादाच्या स्वरूपाची चर्चा होत असे.
सामाजिक सद्भाव, महिला सशक्तीकरण, लोकशाही मूल्य या सर्वांचा यशस्वी प्रयोग करुन भारताच्या जडणघडणीतील लोकोत्तर मार्गदर्शक महात्मा बसवेश्वर यांना जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम...!!