*रमजानचे महत्व*
मुस्लिम समाजासाठी ‘रमजान’ हा महिना इस्लामी जीवनव्यवस्थेच्या संदर्भात अत्यंत महत्वाचा महिना आहे. या महिन्याचे अध्यात्मिक महत्व इतके आहे की जागतिक मुस्लिम समाज दरवर्षी या महिन्याची अत्यंत आतुरतेने वाट पाहत असतो. या महिन्याचा पुरेपूर लाभ प्राप्त करण्यासाठी कित्येक महिन्यापूर्वीपासून तयारी केली जाते. याचा परिणाम जागतिक मुस्लिमेत्तर समाजावरही स्पष्टपणे दिसून येतो. भारतातही हा परिणाम दरवर्षी निदर्शनास येत असतो. मात्र यावेळी चित्र काहीसे वेगळे आहे. मुस्लिम आणि इस्लामविरोधी प्रवाहावर स्वार होऊन प्रतिगामी शक्तींकडून मुस्लिमांच्या धार्मिक पद्धतीवर केली जाणारी टीका दिवसेंदिवस प्रखर होत चालली आहे. समाजातील पुरोगामी वर्गही अनेक प्रकारे मुस्लिमांच्या धार्मिक पद्धतींवर टीका करून प्रतिगामी वर्गाची मुस्लिमविरोधी मांडणी अधिकृत करण्याचे काम करीत आहे. सद्यकालीन संदर्भात प्रतिगामी शक्तींकडून उघडपणे तर पुरोगामी शक्तींकडून छुपेपणे रमजान आणि रोजांच्या अनुषंगाने मुस्लिम समाजावर टीकास्त्र सोडले जात आहेत. तेव्हा रोजे आणि रमजानचे इस्लाम धर्मातील स्थान, त्यांचे महत्व आणि त्यामागचे उद्देश सर्वसामान्यांना माहित व्हावेत, या उद्देशाने एक छोटेखानी लेखमाला लिहिली जात आहे. आजचा लेख या लेखमालेचा पहिला भाग आहे.
. *रमजान या महिन्याचे महत्व:*
रमजान या महिन्याला इस्लामी धर्मशास्त्रात अनन्यसाधारण महत्व प्रदान करण्यात आले आहे. ज्याप्रमाणे एका राष्ट्रासाठी त्या राष्ट्राच्या स्थापनेचा किंवा स्वातंत्र्याचा दिवस महत्वाचा असतो, अगदी तशाप्रकारे इस्लामी धर्मशास्त्रात रमजान या महिन्याचे महत्व आहे. कुरआननुसार रमजान तो महिना आहे, ज्यामध्ये अल्लाहच्या अंतिम मार्गदर्शक ग्रंथाचे अल्लाहच्या अंतिम प्रेषितावर, प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर अवतरण सुरु झाले. पवित्र कुरआनमध्ये याचा जो उल्लेख आलेला आहे तो असा आहे,
रमजान तो महिना आहे, ज्यामध्ये कुरआन अवतरीत केला गेला; जो मार्गदर्शक आहे समस्त मानवजातीसाठी. ज्यात मार्गदर्शनाचे स्पष्ट प्रमाण आणि सत्य–असत्यादरम्यान फरक करणारे निकष आहेत. तेव्हा तुमच्यापैकी जो कोणी या महिन्याला प्राप्त करेल, त्याने उपवास राखावे. परंतु तुमच्यापैकी जो कोणी आजारी असेल किंवा प्रवासात असेल, त्याने [हे उपवास] इतरवेळी पूर्ण करावे. [तुम्हाला ही सवलत देण्यात येत आहे कारण] अल्लाह तुमची सुविधा इच्छितो, तुम्हाला कष्ट देऊ इच्छित नाही. [तेव्हा तुमच्यावर अनिवार्य आहे की] तुम्ही [रमजानच्या उपवासांची] निर्धारित संख्या पूर्ण करावी आणि अल्लाहने तुम्हाला जे [कुरआन] मार्गदर्शन दिले आहे, त्यावर अल्लाहच्या महानतेचे वर्णन करीत रहावे आणि त्याच्या [उपकारा] प्रति कृतज्ञता बाळगावी. *[कुरआन, सुरह बकरा, आयत १८५] [अनुवाद : कुरआन अकादमी]*
उपरोक्त आयतीनुसार इस्लामी कॅलेंडरच्या ९ व्या महिन्यात, रमजानमध्ये कुरआनचे अवतरण सुरु झाले आहे. कुरआन – जो जगातील एकमेव जिवंत ग्रंथ आहे. जो सर्वाधिक वाचला आणि अनुकरण केला जाणारा ग्रंथ आहे. मागील १४४० वर्षांपासून या ग्रंथाने जगावर आपला प्रभाव पाडला आहे. हा ग्रंथ अगदी सामन्यातील सामान्यांपासून विद्वान, विचारवंत आणि दर्शनिकांपर्यंत सर्वांनाच प्रभावित करीत आला आहे. लाखो अनुयायी या ग्रंथाला मुखोद्गत करतात, याची पारायणे करतात, याची प्रबोधन शिबीरे आयोजित करतात. मुस्लीमेत्तर समाजासाठी आजपर्यंत या ग्रंथाचे शेकडो अनुवाद केले गेले आहेत, भाष्य लिहिली गेली आहेत आणि लाखो आवृत्ती प्रकाशित करण्यात आल्या आहेत. १४४० वर्षापासून वाचला, चर्चिला आणि अभ्यासाला जात असला तरीही या ग्रंथाच्या कुतूहलात तिळमात्रही फरक पडलेला नाही.
कुरआन असा ग्रंथ आहे, जो मुस्लिमांसाठी फुरकानचे स्थान राखतो. फुरकान म्हणजेच सत्य असत्यामध्ये फरक करणारे निकष. कुरआन मुस्लिमांसाठी फुरकान आहे. कयामतपर्यंत मुस्लिमांच्या धार्मिक वादविवाद आणि मतभेदाच्या बाबतीत कुरआनचा निर्णय अंतिम निर्णय असणार आहे.
*अल्लाहतर्फे या महिन्याच्या अध्यात्मिक पुण्याप्रप्तीत वृद्धी:*
अल्लाहने जेव्हा या महिन्याला अंतिम प्रेषितावर अंतिम संदेश अवतरीत करण्यासाठी निवडले, तेव्हा या महिन्याच्या अध्यात्मिक पुण्यातही वृद्धी केली. या महिन्यात मानवातर्फे केल्या जाणाऱ्या प्रत्येक सत्कर्माचा मोबदला देताना तो ७०० पटीपर्यंत वाढवून देण्याचे वचन देण्यात आले. तेव्हा या महिन्यात मुस्लिम समाजात सत्कर्मे करण्याच्या अनुषंगाने एक प्रकारचे स्पर्धात्मक वातावरण अनुभवले जाऊ शकते. या महिन्यात प्रत्येक मुस्लिम व्यक्ती सत्कर्मांच्या बाबतीत अग्रक्रमावर राहण्याचा प्रयत्न करीत असते. तसेच अल्लाहने त्याच्या उपासनेसाठी ज्या पद्धती निर्धारित केल्या आहेत, त्यापैकी एक या महिन्यासाठीच राखीव करून ठेवण्यात आली आहे. नमाज, रोजा, जकात, हज आणि कुर्बानी या अल्लाहच्या उपासनेच्या विविध पद्धती आहेत. नमाज वर्षभर दिवसातून पाच वेळेस अदा करणे अनिवार्य आहे. मात्र रोजांसाठी केवळ रमजानचा महिना निश्चित करण्यात आला आहे.
या दोन कारणांमुळे रमजानला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होते. पुढील लेखात आपण रोजांबद्दल चर्चा करुयात.
_सविस्तर बातमी वाचण्यासाठी या लिंकला क्लिक करा ...
http://dhunt.in/9pPEv?s=a&ss=wsp
SOCIAL MEDIA LINKS
BTV NEWS MAHARASHTRA
* ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लिक करून YOUTUBE ला SUBSCRIBE करा व बातमी SHARE करा..
https://www.youtube.com/channel/UCJW8HEr4JC7GDOMlRmycedw
* ताज्या बातम्या व घडामोडी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://btvnewsmaharashtra.blogspot.com

ताज्या महितीसाठी खालील लिंकला क्लिक करा आणि FACEBOOK PAGE ला भेट देवून LIKE करा..
https://www.facebook.com/btvnewsmaharashtrapage/
* नवनवीन माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकला क्लिक करून DAlLYHUNT ला FOLLOW करा..
https://profile.dailyhunt.in/btvnewsmaharashtra
* नवनवीन माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकला क्लिक करून TWEETER ला FOLLOW करा..
https://twitter.com/BtvnewsM/status/1252251614775316480?s=20