*डॉक्टर-आरोग्य मंदिराचा पुजारी*....डॉ. अरविंद भातांब्रे
जगभरात कोरोनाचे थैमान चालु आहे.सर्व जग भितीच्या वातावरणात जगत आहे.अशा संकटकाळात देशाचे पंतप्रधान ,मुख्यमंत्री,आरोग्य मंत्री,प्रशासन,पोलिसदल,विविधसेवाभावी संस्था आणि *डॉक्टर्स* कर्मचाऱ्यांसोबत कोरोनावर मात करण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहेत .
डॉक्टर्स ,त्यांच्या सोबत काम करणारे नर्सिंग स्टाफ व कर्मचारी यांचा कोरोनाग्रस्त रुग्नांशी फार जवळुन संपर्क येतो. सुरक्षे साठी पुरेशी साधनसामग्री नसताना जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडत आहेत.सरकारी यंत्रणेसोबत खाजगी हॉस्पिटलं पण सेवा देत आहेत.सुरुवातीच्या काळात गर्दी टाळण्यासाठी प्रशानाकडून बाह्य रुग्ण विभाग बंद ठेवुण फक्त अत्यावश्यक सेवा चालू ठेवण्याबद्दल सुचना होत्या.पण यामुळे बऱ्याच जणांचा गैरसमज झाला की प्रायव्हेट डॉक्टर्स आपली रुग्णालये बंद करून बसले आहेत .आता जरी कोरोना ग्रस्तांची संख्या वाढली असली तरी बाह्य रुग्ण व आंतररुग्ण विभाग चालू आहेत .
बरीचशी सरकारी व प्रशासकीय यंत्रणा ,नेते मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून सूचना देत असताना डॉक्टर्स मात्र आपला जीव धोक्यात घालून रुग्णसेवा देत आहेत .भयानक महामारीच्या परिस्थिती मध्ये कशाचीच पर्वा न करता रात्रंदिवस काम करणार्या डॉक्टरांना मानसिक आधार देण्याऐवजी काही पेपरवाले व सोशल मीडियातून टिका करत आहेत.
आपला पेशंट कसा बरा होईल यासाठीच डॉक्टरांची धडपड चालू असते.कोरोनाचे पेशंट झपाट्याने वाढत असताना किती सोशल मिडियावरुन भाषण देणार्या राजकारण्यांना कोरोना झाला.पण *डॉक्टर्स* कोरोना ग्रस्त पेशंटच्या संपर्कात येऊन उपचार देत असताना मृत्यूमुखी पडत आहेत .
कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी सर्वानी एकत्र येवुन लढावे लागेल ,मनोबल उंचवावे लागेल कारण हिच ती वेळ आहे एकमेकांना सहकार्य करण्याची ,पंखाखाली घेण्याची.
आरोग्य मंदिराच्या देव्हार्यातील देव म्हणजे डॉक्टर्स ,परिचारिका व सफाई कामगार .
*जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा*
*डॉ. अरविंद भातांब्रे*
0 Comments