गोरगरीब गरजू आहेत पण भिकारी नाहीत -जॅकीदादा सावंत 

  एकीकडे आज कोरोना व्हायरस च्या नावाने संपूर्ण देश एकवटला असून प्रत्येक व्यक्ती हा भयभीत झाला आहे.देशाचे मा. पंतप्रधान, मुख्यमंत्री हे वेगवेगळे ध्येय व धोरण आखत आहेत व सर्व यंत्रणा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दूर करण्याचा प्रयत्न चालू आहे. 

तर दुसरीकडे गोरगरीब, मजुरदार, रोजंदार हे कोरोना ने तर व्याकूळ आहेतच परंतु परिस्थितीने सूद्धा परेशान झाले आहेत परंतु लाँकडाऊन असताना रोजगार नसल्याने हा गोरगरीब वर्ग पोटाची खळगी भरण्यासाठी रात्रभर न झोपता डोक्यात एकच विचार घेऊन बसला आहे की, आज खळगी भरली तर उद्याचं काय?  हा प्रश्न त्यांचा डोक्यात सारखं भेडसावत आहे. 

परंतु तिसरीकडे राजकीय लोकांच्या डोक्यात फक्त आणि फक्त राजकीय गोष्टी व राजकारण भेडसावत आहे तर ते म्हणजे चारान्याचं मटेरियल बाराण्याचा प्रचार. 
अहो कसली देशाची शोकांतिका आहे. गोरगरीबांचं जगणं -मरणं एक झाल्याचं दिसून येत आहे .कारण बाहेर गेलो तर कोरोनाने मरू व घरात राहीलो तर उपासमारीने मरू आणि अशा परिस्थितीत राजकीय लोक हे दबलेल्या, खचलेल्या, व्याकुळ, परीस्थितीने मजबुर असलेल्या लोकांना चारान्याचं मटेरियल देऊन बारान्याचा प्रचार करीत आहे. हे लोक परीस्थिती ने मजबुर आहेत पण भिकारी नाहीत हे राजकीय लोकांनी लक्षात घ्यायला हवं, अहो का त्यांची इज्जत चव्हाट्यावर आणता? ही परिस्थिती राजकारण करायची नाही तर देश, देशातील नागरीक वाचवायची आहे.
माझं काही जणांना वाईट वाटत असेल परंतू ही वेळ नाही कारण आपण दानशूर आहात हे माहीत आहे व आपले कार्य हे अनमोल आहे अशा परिस्थितीत करण्याची गरज आहे. पण असं ही नाही की गोरगरीब, मजबूर लोकांची ईज्जत चव्हाट्यावर आणणं, कारण आपण जर असं केलात तर नंतर हे लोक देखील मदत मागण्यास नकार देतील व उपासमारी वाढेल .
तर मा. सर्वांना व प्रशासनाला अशी विनंती आहे की त्या -त्या वार्डातील मजुर, मजबुर, रोजंदारी लोकांची यादी करुन तेथेच घरपोच त्यांची व्यवस्था करावी व दानशूर व्यक्तींनी देखील राजकारण न करता प्रशासनाकडे जीवनावश्यक वस्तू द्यावे जेणेकरून त्या शेवटच्या गरजू पर्यंत पोहचलं पाहीजे कारण आपल्या राजकारणामुळे त्यांच्या भावनांची कदर होत नाही हे समजून घ्यावे. 
   

                  जॅकीदादा सावंत,
 टायगर सेना संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष 
  मो. ७८४१००२०९७