देवणीत पालीतील कुटुंबाला रा.काँ.कडुन धान्याचे किट वाटप
तालुकाध्यक्ष प्रा.अनिल इंगोलेचा पुढाकार ...

देवणी : कर्तव्य बजावणार्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा किट वाटपानंतर देवणीतील गरजु व्यक्तीना संचारबंदीच्या काळात हातावर पोट असलेल्या गरजवंताना अन्नधान्य किट वाटप राकाँ तालुकाध्यक्ष प्रा.अनिल इंगोले यांच्या पुढाकारातुन तहसिलदार सुरेश घोळवे यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले.
      सोमवार व मंगळवार सलग दोन दिवस देवणी येथे राष्ट्रवादीच्या वतीने लॉकडाऊन च्या काळात ज्यांच्या घरी कमावता व्यक्ती नाही व तसेच परराज्यातुन ,परजिल्ह्यातुन उदरनिर्वाहासाठी आलेल्या लोकांना त्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी ठरवुन दिलेल्या किटप्रमाणे गहू, तांदूळ, तेल,मीठ,मिरची,साबण,खोबर तेल, डाळ, फळे,या वस्तुच्या किटचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपताना माणुसकीचे दर्शन घडविले आहे.देवणी येथे गेल्या पाच वर्षापुर्वी पशुचे (म्हशी)केस कापणारे कारागीर देवणीत स्थिरावले आहेत त्यांच्या उपजिविकेचा प्रश्न तुर्तास मिटला आहे.यावेळी राकाँचे तालुकाध्यक्ष अनिल इंगोले यांनी अन्नधान्याचे किट  वाटप केले.यावेळी  अजय शिंदे. राजू साबणे. मसगल्ले. गजानन भोपणीकर रमेश कोतवाल,अमर मुर्के, दत्तात्र्य महाराज बिजलगावकर युवकचे अध्यक्ष महेश जाधव, शहराध्यक्ष अमर बोरे. प्रशांत घोलप,जावेद शेख,फिरोज शेख, गोपाळ दापके,धोंडू तात्या सोळुंके पोलीस कॉन्स्टेबल कासले. दिलीप फसाळे आदीची उपस्थिती होती.