देवणीत बेघर निराधार ३० महिलांना जिवनावशयक वस्तूची मदत ...
इंडिया कोरो व श्रमिक हक्क अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने मदत
देवणी शहरात बेघर निराधार महिलांना मदतीचा हात म्हणून कोरो इंडिया मुंबई व श्रमिक हक्क अभियान देवणी यांच्या संयुक्त विद्यमाने बेघर निराधार महिलांना जिवनावशयक वस्तूचे ३० किट गुरुवारी तहसीलदार सुरेश घोळवे व पोलीस निरीक्षक सितंबर कामठेवाड यांच्या प्रमुख उपस्थित वितरण करण्यात आले.
देवणी येथील श्रमिक हक्क अभियानचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर सुर्यवंशी यांच्या प्रयत्नाने सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या मुंबई येथील कोरो इंडिया या संस्थेच्या मदतीने देवणी शहरातील बेघर निराधार व गरजू महिलांना गव्हाचे पिठ, तांदूळ, खाद्यतेल, मीठ, मिरची, साबण, खोबर तेल, दाळ, आदी वस्तू प्रत्येकी ९०० रुपये किमतीचे जिवनावशयक वस्तूचे किट. असे ३० किटचे वितरण यावेळी करण्यात आले.
0 Comments