लाॅक डाऊन आणि मजुरांची दुरावस्था ; आदर्श गाव निर्मितीची गावकऱ्यांना संधी..!!
----- तहसीलदार सुरेश घोळवे 
          "पूर्वी ग्रामीण संस्कृती मध्ये शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा आधार होता. शेतकरी, शेतमजूर यांच्या सह, बारा बलुतेदार आणि तेरा अलुतेदार यांच्या व्यवसायांनी खेड्यातील लोकांच्या गरजा खेड्यातच भागत होत्या. आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये, बदलत्या सामाजिक दृष्टीकोनासोबत, समाजातही बदल होत गेले. त्यामुळे परंपरागत व्यवसाय मोडीत येऊन शहरीकरणाकडे वाटचाल सुरू झाली.
      पण एवढ्या मोठ्या लोकसंख्येला शहरात रोजगाराची संधी मिळत नव्हती. त्यामुळे मजूर वर्गाकडून आपल्या गावात काम करण्याऐवजी दुसऱ्या तालुक्यात, दुसऱ्या जिल्ह्यात, दुसऱ्या राज्यात जाऊन कामे करण्याची परंपरा निर्माण झाली.सध्या कोरोना या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय केलेले आहेत व लॉक डाऊन ची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये असंख्य मजूर देशभरात अडकून पडल्याचे दिसून येत आहे. अर्धे कुटुंब गावात आणि अर्धे कुटुंब सोबत अशा मानसिकतेत, आपापल्या गावाकडे जाण्यासाठी त्यांची तळमळ आहे, परंतु त्यांना जाता येत नाही. ज्या ठिकाणी ते काही महिन्यापासून राहत होते, तिथेही त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
         या साठी प्रशासनाला कोरोनाचे प्रतिबंध करण्यासोबत अशा अडकून पडलेल्या व्यक्तींची सोय करण्याची जबाबदारी जास्त पार पाडावी लागत आहे. तरी देखील त्या त्या  परिसरातील नागरिकांनी लॉक डाऊन संपेपर्यंत त्यांच्याकडे माणुसकीच्या नजरेतून मदत व आधार देण्याची गरज आहे.
        भविष्यात पुन्हा हीच परिस्थिती उद्भवू नये म्हणून, खेड्यांचा सर्वांगीण विकास करणे आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून का होईना, परंतु ग्रामीण भागातील सर्व लघु उद्योग, कुटिरोद्योग, परंपरागत व्यवसाय यांना चालना देऊन स्थानिक स्तरावर विविध प्रकारची उत्पादने निर्माण करून रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची गरज आहे.आता lock down परिस्थिती आहे. गावातील सर्व लोक गावातच आहेत. ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य यांना वेळ आहे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, पोलिस पाटील यांचीही इतर कामे बंद आहेत. अशा परिस्थितीमध्ये दररोज ग्रामपंचायतीमध्ये बसून याबाबत चर्चा केली पाहिजे व भविष्यासाठी नियोजन केले पाहिजे. शहराजवळील वीटभट्टीवर काम करत असताना मजूर