लाँकडाऊनच्या नावाखाली कोरोनाचा प्रसार जोरात
----- जाँँकी सावंत
====================
"सरकारला समजत नाही लाँकडाऊनच्या नावाखाली कोरोनाचा प्रसार हा मोठ्या प्रमाणावर होत असून या लाँकडाउन मुळे रोजगार बंद होत आहेत व जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी दुकाने उघडी. तर पैसा येणार कोठून व उदरनिर्वाह होणार कसं... मग उपासमारीने आत्महत्या करण्यास मजबूर... प्रवृत्त करण्याचं काम सरकारनेच चालू केले आहे कि काय हे नाकारता येत नाही. जर कोरोना मूळापासुन नष्ट करायचा असेल तर सरकारने घरपोच जीवनावश्यक वस्तू द्यावे .
अजूनही वेळ गेलेली नाही अन्यथा सोशल डिस्टंसीग म्हणून फुकट मरुन जावे लागेल. याला एकच उपाय ते म्हणजे घरपोच जीवनावश्यक वस्तू देणे मगच आपण करोनावर मात करु शकतो अन्यथा नाही.या जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरीक हे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात फिरत आहेत व याच कारणामुळे भारतातील आकडेवारी वाढण्यासाठी आपण सर्वजन सहकार्य करत आहोत असे म्हणण्यास काहीही हरकत नाही.
मा. पंतप्रधान, मा. मुख्यमंत्री साहेबांनी जर प्रत्येक नागरिकाला लागणारे जीवनावश्यक वस्तू आपल्या शासकीय कर्मचारी यांच्या माध्यमातून दिले तर कोणताही व्यक्ती हा रस्त्यावर फिरताना दिसणार नाही व सर्व देश हा सुखरूप राहील व आपण कोरोनावर मात करण्यासाठी आपल्याला काही अडचण निर्माण होणार नाही.
तात्काळ उपाययोजना केल्यास ==================
* जीवनावश्यक वस्तू अन्नधान्य, भाजीपाला, दूध मोफत घरपोच द्यावे जेणेकरून कोणताही व्यक्ती उपासमारीने मरणार नाही, आत्महत्या करणार नाही, बाहेर रस्त्यावर येणार नाही.
*मोबाईल ईंटरनेट , टी. व्ही यांना तीन महिने रीचार्ज मोफत द्यावा जेणेकरून शासकीय हालचाली नागरिकांना समजतील.
* औषधी दुकाने, दवाखाने, ATM, 24 तास उघडे करावे जेणेकरून नागरिकांना अडचणी निर्माण होणार नाहीत.
(टिप -जीवनावश्यक वस्तू प्रत्येक नागरीका पर्यंत नाही मिळाल्यास त्यासाठी एक टोल फ्री नंबर ठेवावा म्हणजे घरात बसुन तक्रार नोंद करता येईल व यावर ०६ तासात चौकशी करुन कार्यवाही व्हावी .) कारण सरकारने केलेल्या घोषणाची ,एकही योजनाची कसल्याही प्रकारची अंमलबजावणी झालेली नाही. जनता उपासमारीने व्याकूळ झाली आहे.
मग पुढील लाँकडाऊन हा जनतेसाठी, प्रशासनासाठी अवघड जाणार नाही कारण कोणीच रस्त्यावर दिसणार नाही. कारण पुढे पावसाळ्यात आपण कोरोनाला मात करू शकणार नाही आपल्याकडे फक्त दोन महिने शिल्लक आहेत नंतरचे दिवस खुपच वाईट,धोकादायक असणार आहेत म्हणून तात्काळ निर्णय घेणे गरजेचे आहे...!
जॅकीदादा सावंत
टायगर सेना संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष,
मो. ०७८४१००२०९७
0 Comments