भारतीय बौद्धमहासभा मुखेड.
एक तर्कशुद्ध विश्लेषण
मुखेड तालुक्यातील सर्व बौध्द उपासक उपसिका याना सप्रेम जयभीम🙏
आज संपूर्ण देशात कोरोणा विषाणू मुळे जनता भयभीत झाली आहे गेली 20 तारखेपासून pm व cm यांच्या आदेशाचे व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत आहे, 95 टक्के जनता घरीच आहे5 टक्के अपवाद असतील
महाराष्ट्र सरकार खूप मोठ्या प्रमाणात काळजी घेत आहे
कांही बाबीवर गोर गरीबजनतेसाठी अजून बरेच कांही चांगले निर्णय अपेक्षित आहेत
चीन ,इटली, अमेरिका, व इतर देशात कोरोणा विषाणूचा प्रसार होत असताना विमान सेवा बंद केली असती तर , , , ,
जर बाहेर देशातून आपले नागरिक आले असतील तर त्यांना 21 दिवस अलग ठेवले असते तर, , , , ,
या व अनेक गोष्टी मा, प्रधानमंत्री साहेबाना करता आल्या असत्या दुर्लक्ष का झाले, , ,
प्रधानमंत्री या अगोदर मिडियासमोर आले अन सांगितले कि रुग्णाची सेवा करणारे डॉक्टर, नर्स, पोलीस, यांच्या सेवेबद्दल त्यांचेअभार मानण्यासाठी टाळ्या, थाळ्या वाजून आभार मानुया कांही जनतेने ते पण केले
नंतर प्रधानमंत्र्याने कांही जनतेसाठी यौजना जाहीर केले
ते जनतेला कधी लाभ मिळेल ठोस भूमिका नाही
दुसऱ्यांदा जेव्हा मिडियासमोर आले तर जनतेच्या खूप मोठ्या अपेक्षा असताना 5 तारखेला रात्री 9,9वाजता मेणबत्ती, दिवे, लावायला सांगितले,हे मात्र अजब वाटले,
कारण मेणबत्ती लावणे दिवा लावणे हे उत्सवाला केले जाते किंवा एखाद्या सैनिकाने देशासाठी प्राणाची बाजी लावता लावता शहीद झाले तर मेणबत्ती लावून अभिवादन केले जाते
पण
सध्या कोणता उत्सव नाही किंवा कोणी शहीद झाले नाही किंवा कोरोणा विष्णुबाबत कोणतेही वैज्ञानिक पुष्टी नाही
तरी मेणबत्ती दिवा लावायला का सांगितले यावर चिंतन केल्यावर एक मात्र बाब समोर आली ती ही कि 5 तारखेला ज्या वामनाने बळीराजा यांची हत्या केली त्या वामणाची जयंती आहे
महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचे राज्य आहे.
बुद्ध, शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ, यांच्या विचार प्ररनेने चालणारे राज्य आहे येथे अंधश्रद्धा, अंध भक्ती, किंवा लादलेले विचार कधीच आम्ही स्वीकारणार नाही अशी जनतेची भावना आहे,
बौद्धाने तर विज्ञान वाद स्वीकारलेले आहेत तेव्हा सर्वाना विनंती आहे आपण वरील विवेचनावर विचार करून महापुरुषाला अभिप्रेत असलेली समाजहिताची विचारधारा अवलंबूया
मेणबत्ती, दिवे लावणे यांचा जाहीर विरोध करूया
कोरोणा प्रतिबंधासाठी सर्वानी घरी राहा, सुखी राहा
🌷भवत्तु सब मंगल🌷.
🙏जयभीम🙏
आपला धम्मबंधु
गंगाधर सोंडारे बावलगावकर
अध्यक्ष
0 Comments