आज महादेव वाडी येथील मजूरांची भेट घेतली. त्याठिकाणी परभणी जिल्ह्यातील 11 कुटुंबातील 24 सदस्य आहेत. ते मुख्यमंत्री सडक योजनेच्या कामासाठी आलेले होते. महादेववाडी व दवनहिपरगा यादरम्यान होत असलेल्या रस्त्याच्या कामासाठी ते दोन महिन्यापासून त्या ठिकाणी राहत आहेत. कोरोना पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन झाल्यामुळे त्यांना गावाकडे जाता आले नाही. सद्यस्थितीत त्यांच्याकडे पैसे आहेत, तसेच संबंधित कंत्राटदार यांच्यामार्फत त्यांना राशन ची सोय करण्यात आलेली असून त्यांची कोणतीही अडचण नसल्याचे त्यांनी सांगितले. पण शासनाकडून गावी जाण्याची सोय व्हावी, ही इच्छा त्यांनी व्यक्त केली. तथापि 14 तारखेपर्यंत त्यांना गावाकडे जाता येणार नाही, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.  संबंधित  कंञाटदार यांनी 14 तारखेपर्यंत त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याची हमी दिली असली तरी देखील यात अडचण आली तर प्रशासनाकडून त्वरित जीवनावश्य।क  सर्व गोष्टींचा पुरवठा केला जाईल,  असे सांगण्यात आले. दवनहिपरगा सजाचे तलाठी यांना याठिकाणी दररोज भेट देऊन कोणतीही अडचण आल्यास एक दिवस अगोदर पूर्वसूचना देण्याबद्दल आदेशित करण्यात आले..              महादेव वाडी येथे मजूरांची भेट