बांधावर खत वाटप योजना.
या खरीप हंगामामध्ये आपल्याला शेतकऱ्यांच्या बांधावर खत वाटप योजना मोठ्या प्रमाणावर राबवायची आहे. यामध्ये अनेक प्रकारचे गैरसमज शेतकऱ्यांमध्ये ,दुकानदारा मध्ये आणि कृषि सहाय्यकामध्ये आढळून आले आहे आहेत. त्यामुळे आपणास नेमकी कशा प्रकारे ही योजना राबवायची आहे याची स्पष्टता येणे येणे जरुरीचे आहे.
आत्मा मार्फत स्थापन करण्यात आले आलेले शेतकरी गट तसेच गावात कार्यरत असणारे इतर योजनांचे ही शेतकरी गट यांचा सहभाग आपल्याला यामध्ये घ्यायचा आहे.
तीन-चार वर्षांपूर्वी आपण शेतकऱ्यांच्या बांधावर खत वाटप योजना राबवली होती. यामध्ये आपण एम.ए.आय.डी.सी.किंवा इतर कंपनीच्या नावे आपण डीडी काढून देत होतो आणि आपल्याला थेट गावामध्ये गावामध्ये खतपुरवठा होत होता.
यावर्षी मात्र ही संकल्पना अपेक्षित नाही.कारण खत विक्री ही पीओएस POS मशीनच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आधार नंबर घेऊनच विक्री केली जाते.
*त्यामुळे आपल्याला खालील पद्धतीने खत खरेदी करणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या खतांची यादी शेतकरीनिहाय करावी सोबत त्यांचा आधार क्रमांक लिहिणे आवश्यक आहे आणि अशी साधारण दहा ते पंधरा शेतकऱ्यांची यादी ही गट प्रमुखाने तयार करून त्यास लागणारी रक्कम संबंधित शेतकऱ्याकडून घ्यावी. अशी एकत्रित खरेदी संबंधित खत दुकानदाराकडून एका व्यक्तीकडून व्हावी, सर्वांनी खत खरेदीसाठी दुकानात गर्दी करू नये आणि सुरक्षित अंतर पाळून कोरोना रोगाचा प्रसार करू नये हा यामागचा उद्देश आहे.
या योजनेत भाग घेण्यासाठी गटच असावा असे बंधन नाही.
खत खरेदी साठी इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी तयार करून त्यापैकी एक शेतकऱ्याने सर्वांच्या वतीने प्रत्यक्ष दुकानातून खरेदी करावी ही अपेक्षा आहे.
*ऐन हंगामात शेतकरी खत खरेदी खत व बियाणे खरेदीसाठी एकाच वेळी गर्दी करतात ज्यामुळे कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची तीव्र शक्यता आहे.
*ही बाब आपल्या गावातील शेतकऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यावी.
*खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांची खत खरेदी पूर्ण होईल असे नियोजन आपण नक्की कराल अशी अपेक्षा आहे.
0 Comments