महान शिक्षक गुरू, समाजसुधारक आणि रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील ..
मुंबई : बालपणापासुन भाऊराव बंडखोर स्वभावाचे होते. अन्याय त्यांना कदापीही सहन होत नसे. जातीभेद, स्पृश्यअस्पृश्य हा भेदभाव पाहुन त्यांच्या मनात प्रचंड चिड निर्माण व्हायची. एकदा अस्पृश्यांना विहीरीतुन पाणी भरू दिले जात नाही हे पाहुन त्यांनी त्या विहीरीचा रहाटच तोडुन टाकला. एवढी चीड जातीभेदाला पाहुन त्यांच्या मनात उत्पन्न व्हायची.
सुरूवातीचे शिक्षण कुंभोज त्यानंतर दहिवडी आणि विटे येथे पार पडले. राजाराम हायस्कुलला माध्यमिक शिक्षणाकरता प्रवेश घेतला (1902-1909 ) भाऊरावांचा जन्म एका जैन कुटुंबात झाला होता. शिक्षणाकरता ते जैन वसतीगृहात राहात असतांना एकदा एका अस्पृश्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर वसतीगृहात परतल्यावर त्यांना स्नान करण्याचा आग्रह धरण्यात आला त्यांनी तो नियम मोडला आणि त्यामुळे त्या वसतीगृहातुन त्यांना हाकलुन देण्यात आले.
भाऊराव तेथुन शाहु महाराजांकडे राजवाडयात आले. शाहु महाराजांच्या कार्याचा, त्यांच्या विचारांचा भाऊरावांवर चांगलाच प्रभाव पडला. पुढे महात्मा ज्योतिबा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीशी त्यांची नाळ बांधल्या गेली आपसुकच फुलेंच्या आणि विðल रामजी शिंदेंच्या कार्याचा प्रभाव त्यांच्यावर पडत गेला.
ईस्लामपुर या गावी भाऊरावांनी एका अस्पृश्य विद्याथ्र्याला वर्गाच्या बाहेर बसुन शिकत असल्याचे पाहिले. त्याक्षणी त्यांच्या मनाला फार वेदना झाल्या. ज्ञानदेव घोलप नावाच्या त्या विद्याथ्र्याला त्यांनी सोबत घेतले, आपल्या घरी नेउन त्याला आपल्याबरोबर जेवावयास बसविले कोल्हापुर येथील एका वसतीगृहात त्याला प्रवेश मिळवुन दिला.
भाऊरावांनी ज्या विदयाथ्र्याकरता हे सर्व केलं तो ज्ञानदेव घोलप पुढे रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी झाला. याशिवाय विधानसभेचा प्रथम मागास सदस्य प्रतिनीधी देखील बनला.
सहाव्या वर्गात असतांना भाऊरावांनी इंग्रजी शाळेला रामराम ठोकला आणि सातारा या गावी खाजगी शिकवणी सुरू केली. या ठिकाणी “पाटील गुरूजी” म्हणुन त्यांना चांगलीच प्रसिध्दी मिळाली. भाऊसाहेब कुदळे, नानासाहेब येडेकर, मदवानगुरूजी यांच्या संपर्कात ते आले आणि 1909 ला दुधगावी ’दुधगाव विद्यार्थी आश्रमा’ची त्यांनी स्थापना केली. सगळया जातीधर्माच्या मुलांकरता या संस्थेने एका वसतीगृहाची सोय केली.
महाराष्ट्रातील जनतेने त्यांना “कर्मवीर” ही पदवी बहाल करून त्यांचा यथोचित गौरव केला आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील यांची महत्वाची कार्ये –
◆ 1919 साली बहुजन समाजाला शिक्षण मिळावे या उदात्त हेतुने शैक्षणिक संस्था सुरू करण्याकरीता प्रस्ताव मंजुर करून घेतला.
◆ 1919 साली 4 ऑक्टोबर ला विजयादशमीच्या मुहूर्तावर भाऊरावांनी ’’रयत शिक्षण संस्था’’ स्थापन केली.
◆ या संस्थेची स्थापना काले (सातारा जिल्हा) या गावी करण्यात आली होती
◆ काले या गावीच या संस्थेच्या वतीनं वसतिगृह, प्राथमिक शाळा, आणि एका रात्रशाळेची त्यांनी सुरूवात करून शैक्षणिक कार्य केले.
◆ भाऊरावांनी विद्याथ्र्यांमधे समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक जाणीव यांची बीजं रोवली
◆ रयत शिक्षण संस्थेची चतुःसुत्री म्हणजे स्वावलंबन, स्वाभिमान, स्वतंत्र आणि स्वाध्याय.
◆ शिक्षणाच्या दृष्टीकोनातुन जो वर्ग मागासलेला आहे त्यांना शिक्षणाची गोडी लागावी, त्यांना निशुल्क शिक्षण मिळावं, वेगवेगळया धर्मातील, पंथातील विदयाथ्र्यांना एकमेकांप्रती प्रेमाची भावना निर्माण व्हावी, जुन्या चालिरीतींना मुठमाती देउन विद्याथ्र्यांमधे विकासाचे संस्कार घडवावे, एकजुटीचे महत्व पटवुन देणे, विदयार्थी काटकसरी, स्वावलंबी, उत्साही आणि चारित्र्यवान घडविण्याचा प्रयत्न करणे, बहुजन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याकरता प्रसंगी संस्थेचा क्षे़त्रीय दृष्टया विस्तार करणे ही या रयत शिक्षण संस्थेची उद्दिष्टं होती.
भारत सरकारनं कर्मवीर भाऊराव पाटलांना ‘पद्मभुषण’ या पुरस्काराने गौरवान्वित केले आहे.
पुणे विद्यापीठाने 1959 साली ’डॉक्टर ऑफ लिटरेचर’ या पदवीने त्यांचा यथोचित सन्मान केला आहे.
0 Comments