जागृत इतिहासाचा शोध : आजची अयोध्या म्हणजे बुद्धकालीन साकेत
जम्बुद्वीप आजच्या भारताचे पूरातन नाव, देशाचा इतिहास मोहंजदरो हडप्पा संस्कृतीने उजागर होतो.
रामाचे राज्य अयोध्येत होते असे रामायण कथेत सांगितले आहे आणि ही अयोध्या शरयू नदीच्या काठावर होती असे सांगितले जाते. परंतु आठदिवसापासून सपाटीकरणाच काम करत असताना बुध्दकालीन अवशेष, बुध्द मूर्ती, इतर अनेक गोष्टी सापडत आहेत त्यामूळेजनतेच्या मनात प्रश्न निर्माण होने स्वाभाविक आहे. परंतू मनूवादी मेडीया विदृपीकरण करीत आहे.
शुध्द प्रकाश झोताकरीता हा लेख लिहिला आहे. अयोध्येला बुद्धाने भेट दिल्याचे पुरावे आहेत. इसवी सन पूर्व सहाव्या शतकात तथागत बुद्ध येथे आले होते.तेव्हा तिला साकेत नगरी या नावाने ओळखले जायचे. नंतर अयोध्या नेमकी कशी तयार झाली याची काही उदाहरणे सुद्धा आहेत . इ. स. पाचव्या शतकात कालिदास नावाचा कवी होवून गेला त्याने " रघुवंश " नावाचे महाकाव्य लिहिले. यामधे हा कवी या स्थानाचे नाव कधी अयोध्या तर कधी साकेत असा उल्लेख करतो, त्यावेळी मात्र प्रश्न निर्माण होतो तो असा कि हे स्थान बौद्धांचे प्रसिद्ध महानगर व मोठे व्यापारी केंद्र साकेत तर नसावे ?
यासाठी बौद्धांचे साकेत कसे होते हे देखील पाहू या.
" बुद्धपूर्व काळात भारत सोळा जनपदांमध्ये विभागला होता ती जनपदे अशी होती. काशी, कोसल, अंग, मगध, वज्जि, मल्ल, चेदी , वत्स, कुरु , पंचाल, मत्स्य, सुरसेन ,अस्सक ,अवंती, गंधार आणि कम्बोज . यामध्ये अनेक शहरे आणि निगम व गावे होती परंतु त्यावेळी महानगरे फक्त सहा होती ती अशी - चंपा ,राजगृह, श्रावस्ती, साकेत, कोशांबी आणि वाराणसी. याकाळात बुद्धाचे महापरीनिर्वाण होण्यापुर्वी आनंद याने तथागत बुद्धानां या महानगरीमध्ये धम्मोपदेशाकरीता जाण्याची विनंती देखील केली होती संदर्भ शोधा... {दिघनिकाय १६. ५. १७. }
तथागत बुद्ध आपल्या धम्माचा प्रचार करीत सतत ४५ वर्षे चारिका भ्रमण करीत राहिले आणि ज्या ज्या ठिकाणी भगवान बुद्ध गेले आहेत त्याच्यां नोंदी त्रिपिटका मध्ये सापडतात . चिनी यात्री फायान आणि ह्युयांग शांग यांच्या प्रवास वर्णनात साकेत नगरी सापडते, तसेच त्रिपिटकात साकेत नगरीच्या हि नोंदी आहेत.
कोसल वासीय ब्राह्मण बावरी साधना करीत थेट दक्षिण पथामधील गोदावरी नदीच्या तीरावर अस्सक नावाच्या स्थानाजवळ आश्रम करून राहत होता त्याने ऐकले होते कि गौतम गृहत्याग करून श्रमण होवून सम्यक बुद्ध झाला आहे . त्याने बुद्धांची भेट घेण्यासाठी आपले सोळा शिष्य ज्या मार्गाने गेले , त्यातील प्रमुख शहरांची नावे आहेत प्रतिष्ठान , महिष्मती ,उज्जैन , गोनद्ध , वेदिसं, वनसह्य, कोसंबी, साकेत आणि श्रावस्ती म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणाऱ्या मार्गावर साकेत लागत होते . आणि नंतर श्रावस्ती वरील माहिती व मार्गाच्या नोंदी सुत्तानितापातातील पारायणवग्ग मधील वत्थुगाथेत { ३६. ३७. ३८. } उपलब्ध आहेत येथे साकेत च्या सबंधित नोंदींचा विचार करणे आवश्यक आहे. विनयपिठका मध्ये श्रावस्ती आणि साकेत यांचा मार्ग सांगितला आहे कारण भिक्षु साकेत वरूनच श्रावस्ती ला जायचे .
आनंद यांच्याकडे असणारे अतिरिक्त चीवर सारीपुत्त यांना देण्यासाठी ते साकेत मध्ये गेले होते . तसेच पाथेय्यक भिख्खू बुद्धाबरोबर वर्षावास घालवावा म्हणून श्रावस्ती ला जाण्यास निघाले परंतु वेळेवर न पोहचल्याने ते साकेत मधेच राहिले कारण वर्षाकालात भिक्षुनां प्रवास करण्यास मनाई होती हा संघाचा नियम होता , तेव्हा ते असे हि म्हणाले कि तथागत आमच्यापासून सहा योजन दूर आहेत परंतु आम्हाला तथागत यांचे दर्शन घेता येत नाही . या विचाराने ते खिन्न झाले होते. महावग्ग मध्ये अश्या नोंदी सापडतात
आणि महत्वाची गोष्ट म्हणजे साकेत शहर हे सरयू नदीच्या तीरावर वसलेले होते कारण याच तीरावर अंजन वनात भगवान बुद्ध आणि त्यांचे शिष्य थांबले होते.
रामायणात अयोध्या हि शरयू नदीच्या पात्रापासून दीड योजन म्हणजे १५ मैल अंतरावर आहे परंतू हि शरयू नदी ऋग्वेदात मात्र सिंधू नदीच्या पश्चिमेला असून ती पश्चिमेला तोंड करून वाहते असे सांगितले आहे तर उत्तर प्रदेशातील शरयू नदी हि उत्तरेकडून खाली वाहत गंगेला मिळते यावरून साकेत हीच अयोध्या आहे असे निष्पन्न होते. पतंजली याने पाणिनीच्या व्याकरणावर भाष्य करण्यासाठी महाभाष्य नावाचा ग्रंथ इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात लिहिला होता, त्यात त्याने यदनराज मिनडर( राजा मिलिंद ) याने माध्यमिक आणि साकेत वर ताबा मिळवल्याचा उल्लेख महाभाष्य मधे केला आहे शिवाय वायू पुराणात हि साकेत चा उल्लेख आहे पुराणामध्ये अनेक ठिकाणी साकेत चा उल्लेख पाहायला मिळतो .
शिवाय एक महत्वाचे उदाहरण म्हणजे मथुरेला जशी कृष्णाची नगरी सांगण्याचा प्रयत्न केला , पण उत्खनन करतात तेव्हा बुद्धाचे अवशेष सापडले आणि त्याचा महत्वाचा भाग असा कि चैत्यन्य याने आपला शिष्य लोकनाथ आचार्य यास कृष्णाच्या लीलांनी गाजलेली स्थळे शोधून काढण्यास सांगितले .चैत्यन्य स्वतः मथुरेला वृंदावनात १५१६ ला गेला त्याने अनेक स्थळे शोधली त्यात त्याने राधाकुंड हे नव्याने शोधून काढले होते असे हि सांगितले जाते कि चैत्यन्य आणि त्यांची शिष्य रूपा यांनी पूर्वी विस्मृतीस गेलेली कृष्णालीलांची स्थळे शोधून काढली आणि मग त्यावर वैष्णव भक्तांनीपंधराव्या आणि सोळाव्या शतकावर मंदिरे बांधली पण वास्तविक हि सर्व मंदिरे बौद्ध विहार आणि स्तूप यांच्या अवशेष यांच्यावर बांधली गेली आहेत . आणि अश्याच पद्धतीचे काम हे रामाच्या भक्ताकडून झाले आहे रामालीलांच्या जागी जवळपास ३६० मंदिरे बांधली गेली आणि हे काम राजा विक्रमादित्य याने केल्याचे सांगितले जाते.
आता हा विक्रमादित्य नावाचे पात्र नेमके कोण कारण गुप्त घराण्यात स्कंध गुप्त हे नाव आहे तर हा राजा स्वतः ला रामाशी तुलना करून घेत असे आणि याला या लोकांनी विक्रमादित्य म्हणून म्हटले आहे पण हे सारे थोतांड कसे आहे हे सांगताना आपल्याला स्कंध गुप्त याच्या दोन पिढ्या अगोदर जावून पाहिले पाहिजे. कालिदास याने साकेत आणि आयोध्य हि एकच नावे आहेत असे सांगितले आहे . गुप्तांची राजवट हि इ. सन ३२० मध्ये झाली तेव्हा हि साकेत हे साकेतच या नावाने होते तेथे रामाने राज्य केल्याचा कोणतीही माहिती नाही आणि जे सांगितले जाते कि विक्रमादित्य याने साकेत वर चाल करून मग रामाच्या अयोध्येचा शोध केले हा दावा फोल ठरतो कारण साकेत वर गुप्त राजवटीने कधी हि चाल केलेली नाही याचे प्रमुख कारण आहे अशोकाचे आणि साकेत शहरातील झालेल्या तहाची संधी. कारण अशोकाने साकेत वर हल्ला करण्याचा बेत आखल्यावर साकेत वासियांनी अशोकाशी करार केला होता कि अशोकाच्या साम्राज्यात साकेत येईल पण साकेत चा कारभार हा साकेत वासियांकडे राहील म्हणून अशोकाने साकेत शी कधी हि युद्ध न करण्याचा निर्णय त्यांना दिला होता तेव्हा त्या निर्णयाला अयुद्धा म्हणून संबोधले जाते, आणि अश्याप्रकारे मगध साम्राज्यात कोसल साम्राज्य देखील विलीन झाले होते. अशोकाच्या काळी नंतर अशोकाची राजधानी राजगृह झाली ,आणि राजगृह कडे जाण्याचा मार्ग साकेत मधून निघत होता आता गुप्त जेव्हा सत्तेत आले तेव्हा त्यांनी साकेत वर कधीहि चाल केली नाही , मग विक्रमादित्य साकेत वर चाल करून रामाची अयोध्या शोधतो हा दावा खोटा साबित होतो .शिवाय फाहीयान देखील साकेत ला इ.सन ४०२ ते ४०३ च्या सुमारास आलेला आहे त्याने देखील साकेत चा उल्लेख केला. साकेत शहराच्या दक्षिण द्वाराने बाहेर पडल्यास एक वृक्ष आहे तिथे बुद्ध अनेकवेळा बसले होते आणि त्या ठिकाणी बांधलेला स्तूप आज हि चागंल्या स्थितीत आहे , फाहीयान देखील साकेत चा उल्लेख साकेत म्हणूनच करतो म्हणजे इ. सन ४०३ पर्यंत साकेत चे नाव आहे तेच आहे.
भारतात पुरातत्व विभागाची निर्मिती हि इंग्रजांच्या काळात झाली कारण जेव्हा इंग्रज सरकारी कामासाठी गावोगावी जात तेव्हा त्यांना भग्न अवस्थेत पडलेल्या मुर्त्या , भग्न अवशेष दिसत काही ठिकाणी त्यांना शिलालेख हि सापडत. आणि तेव्हा त्यांनी ते सर्व एका ठिकाणी जतन करून ठेवण्याची संकल्पना केली. त्यातील एक अधिकारी असणारे विलियम जोन्स यांनी १७८४ साली भारतीय पुरातत्व विभागाची स्थापना केली व भारतातील प्रमुख ग्रंथांच्या सहाय्याने ते शोध घेवू लागले आणि हे काम ५० वर्षे चालू होते १८३४ पर्यंत हे काम चालू होते .प्रथम त्यांनी रामायण महाभारत या ग्रंथांच्या बाबतीत शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा रामायणातील रामाचा वनप्रवास अयोध्येपासून लंके पर्यंत चा प्रवास कसा असेल, याचा शोध घेताना त्यांना अनेक पुरावे मिळाले परंतु ते सर्व बौद्ध अवशेष असल्याने इंग्रजांचा शोध घेण्याचा दृष्टीकोन बदलला .मग त्यांनी बौद्ध साहित्याचा अभ्यास करून बुद्धाच्या अस्तित्वाचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि मग भारतात बुद्धाच्या इतिहासाचे उत्खनन होवू लागले त्यात कनिंगहम याने बनारस जवळील सारनाथ येथील स्तुपाचा शोध लावला .१८४५ साली फर्ग्युसन यांनी पश्चिम भारतात कान्हेरी लेण्याचा शोध लावला. आणि त्यांनी "ट्री अन्ड सरपटं व्हरशिप " हा ग्रंथ लिहून त्यात यासह सांची आणि दक्षिण अमरावती ( आन्ध्र प्रदेश ) येथील स्तुपांची माहिती प्रसिद्ध केली . महत्वाचे म्हणजे पुरातन अवशेष यांची माहिती चोहीकडून त्यांना येत होती. ब्रिटिश सरकार ने पेशाने इंजिनिअर असलेल्या अलेक्झडर कनिंगहम यांची नेमणूक आर्कियालॉजी सर्व्हेअर ऑफ इंडिया या नव्या पदावर केली . त्यांनी नोव्हेंबर १८६१ पासून काम हाती घेतले .या काळात सर्व ठिकाणी उत्खनन करताना कनिंघम यांनी ह्युनत्संग आणि फाहीयान यांनी जी माहिती उजेडात आणली होती तिचा आधार घेत उत्खनन सुरु केले. आणि अश्या प्रकारे गहाळ झालेला बुद्धाचा इतिहास पुढे आणला गेला.
बुद्धाच्या हयातीतच बुद्धाच्या शरीराची जतन केली जात असे केश असोत वा नखे यांची स्थापना केली जायची त्यांचे स्तूप बांधले जायचे आणि अश्याच नखे आणि केश असणारा स्तुपांचा उल्लेख हा साकेत मध्ये येतो. तेव्हा स्तूप हे नुसते मातीचे ढिगारे असायचे आणि आत मध्ये बुद्धाच्या शरीर धातू असत . पुढे अशोकाने त्या स्तुपांवर दगड विटांचे बांधकाम करण्यास सुरुवात केली .आणि साकेत इथे अश्याच स्तुपांचा उल्लेख ह्यूनत्सांग याने केले आहे.
रामायण या काव्याला सत्य साबित करण्याच्या नादात, अयोध्या बुद्धाला जमिनीतून बाहेर काढण्याच्या मार्गावर आली , रामायण महाभारत सिद्ध करण्यासाठी १९४७ ते २००३ पर्यंत खूप प्रयत्न केले पण हवे ते सत्य सापडू शकले नाही असे स्वतः जातीने ब्राह्मण असणारे एम. सी .जोशी पुरातत्व विभागाचे तज्ञ सांगतात .त्यांच्या archaeology and indian tradition puratatva मधे त्यांनी याचे खूप विश्लेषण केले आहे.
अयोध्येमधे पुरातन स्थानात मणी पर्वत या नावाने ओळखला जाणारे एक स्थान आहे, हि निसर्गनिर्मित टेकडी नाही तर मानवनिर्मित टेकडी आहे. शिवाय हि विटांचे तुकडे आणि खडीच्या लाद्यापासून बनवलेली आहे तिची उंची ६५ फुट आहे जुन्या विटा ११ इंचाच्या असून जाडी ३ इंचाची आहे. जमिनीपासून ४६ फुट वरच्या बाजूला पश्चिमेकडे खडीच्या लाद्यांची अर्धगोलाकार भिंत आहे तिथे ४० फुट जाडीचे ढीग होते ते पूर्वी त्याच्यावर असलेल्या उंच इमारती पेक्षा कमी जाडीचे होते परंतु ब्राह्मण लोकांनी सांगितले कि रामाला मदत करण्यासाठी सुग्रीवाने चुकून तो पर्वत खाली पाडला आणि तो हा मनी पर्वत.
पर्वत खाली पाडला तरी तो नैसर्गिक असतो मानवनिर्मित होणार नाही या मणी पर्वताचे उत्खनन केले असते तर खरा इतिहास पुढे आला असता पण याचे अद्याप उत्खनन करू दिले गेले नाही. कारण याच्या बांधकाम यावरून यांना देखील संशय आहे कि इथे बुद्धाच्या शरीर धातूवर बांधलेला स्तूप असावा.
कुबेर पर्वत : - हा मणी पर्वताच्या ५०० फुट दक्षिणेला आहे , हा सुद्धा मानवनिर्मित आहे. २८ फुट उंचीचा विटांचा तुकड्यांचा असून इथे कामासाठी विटा नेताना केलेलं खड्डे स्पष्ट दिसतात येथील विटा ११ इंच आणि २ इंच जाडीच्या आहेत इथे एक तलाव देखील आहे त्याला हिंदू लोक गणेश कुंड म्हणतात तर मुस्लिम इमाम तलाव म्हणतात.
सुग्रीव पर्वत :- कुंडांच्या जवळ आग्नेय दिशेला गोलाकार टेकडी आहे यांची उंची साधारण १० फुटापर्यंत असावी असे सांगितले जाते याचे दोन भाग पडतात एक उत्तरेकडील ३०० चौरस फुटांचा आणि एक दक्षिणेकडील २०० चौरस फुटांचा आणि दोघांच्या मध्ये भग्न अवस्थेत एक टेकडी आहे तिथे साडे आठ चौरस फुटाच्या परिसरा मध्ये विटा विखुरल्या आहेत. दक्षिणेकडे एक विहीर आहे.
आता इथे मुस्लिम लोकांच्या कबरी देखील आहते . परंतु ह्यूनत्सांग याने जे वर्णन केलेले कालकाराम विहाराचा उल्लेख साकेत मध्ये सांगितला जातो ते विहार आता सुग्रीव पर्वत म्हणून ओळखले जाते. आता फक्त त्याचे अवशेष राहिले आहेत शिवाय या विहाराच्या बाजूलाच अशोकाने २०० फुटीचा एक स्तूप बांधला होता . बुद्धाने इथे धम्माचे उपदेश दिला होता म्हणून तिथे स्तूप बांधन्यात आला होता. तो स्तूप आज मणी पर्वत म्हणून लोक सांगतात. ह्यूनत्सांग याने या स्तूपाचे स्पष्ट उल्लेख केले आहे .आज हि त्याचे स्थान हे ६५ फुट उंचीचे आणि मानवनिर्मित आहे. आणि विटांचे बांधकाम हे प्रामुख्याने स्तुपाचेच आहे आणि विशेष म्हणजे सुरुवातीचे बांधकाम हे मातीचे असून वरील बांधकाम हे दगड विटांचे आहे त्यामुळे हे स्तुपांचे अवशेष आहेत हे नाकारता येत नाही. ह्यूनत्सांग ने अजून एक उल्लेख केलेला बुद्धांच्या शरीर धातूंचा स्तूप म्हणजे बुद्धांचे केश आणि नखे यावर बांधलेला स्तूप. शिवाय त्याच्या जवळ असणारे तळे जे आज कुबेर टिळा म्हणून किंवा कुबेर पर्वत म्हणून सांगितले जाते .आणि तलाव कोणी गणेश कुंड तर कोणी इमाम तलाव म्हणतात पण हे बुद्धाच्या केश आणि नखांच्या वर बांधलेल्या स्तुपाजवळ असणारे तळे आहे .
कनिंगहम याने सर्व खात्री पटवून सांगितले पण लोकांनी त्यांना उत्खनन करू दिले नाही महत्वाचे म्हणजे कनिंगहम याने त्याच्या रिपोर्ट मध्ये लिहून ठेवले आहे कि इतर पुरातन शहरात दृष्टीस पडतात तसल्या भग्नावस्थेत असलेल्या कृत्रिम टेकड्या मिळत नाहीत परंतु इथे त्या विखुरलेल्या विषम आकाराचे विटांचे ढीग दिसतात शिवाय शेजारी असणाऱ्या फैजाबाद गावामध्ये या विटा काढुन नेल्याचे स्पष्ट खुणा इथे दिसतात कारण या गावातील बहुतांश बांधकाम हे साकेत मधून नेलेल्या पुरातन अवशेषामधिल दगड विटा मधून केले गेले आहे.{ आरकीयालॉजि रिपोर्ट १९६२ -६३ पान ३२१ }
हिंदू धर्माला पुढे नेण्यासाठी बुद्धाच्या एका शिष्य असणाऱ्या हरिती देवी हिला पुढे आणले कारण एक लेणी आणि स्तुपामध्ये या हरीतदेवीच्या मुर्त्या कोरलेल्या आहेत,त्यात तिने काही मुलांना पायाखाली घेतलेला आहे तर काहीनां कडेवर घेतलेला आहे. घटना अशी आहे कि हि देवी लहान मुलांचे जीव घेत असे त्यांना मारत असे हिंसा करीत असे तेव्हा बुद्धांनी तिच्याच मुलाला लपवून ठेवण्यास सांगितले आणि मग बुद्धांनी तिला लहान मुलाचे मृत्युमुळे त्यांच्या मात्यापित्यास काय दुःख होते ते सांगितले यावर पश्चाताप होवून तिने धम्माची प्रवज्जा घेतली,ती बुद्धांची शिष्या झाली, तिची अनेक रूपे कोरण्यात आली .
आणि महत्वाची नोंद घेताना सांगावे लागते कि बाबरी मस्जिदच्या खाली त्रिरत्न चिन्ह चित्रित केलेली मातीच्या भांड्याची कापरे मिळाली त्याच बरोबर अशोककालीन ब्राह्मी लिपी अंकित काही मुद्रा देखील मिळाल्या आहेत . भा. वि. कुलकर्णी यांनी एक खंत व्यक्त केली होती दिनांक ११ ऑगस्ट २००४ च्या महाराष्ट्र टाईम्स मध्ये कि राजकारणासाठी पुरातत्व विभागाचा वापर झाला म्हणून त्यांनी असे हि म्हटले आहे कि अयोद्धेत पाच महिने कडेकोट बंदोबस्ता मधे उत्खनन केले. आणि हे उत्खनन ऐतिहासिक निवाड्याला मदत करणारे आहे .बाबरी मस्जिद च्या खाली ज्या संस्कृतीचे अवशेष सापडले हे शोधण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती आणि अहवालात मंदिर असा शब्द हि न लिहिता अहवाल त्यांनी ईलाहाबादच्या न्यायमूर्ती यांच्याकडे सोपवला .अयोध्येतल्या त्या विशिष्ट टेकडीचा ६० हेक्टरचा भाग सध्या रामटेक मध्ये मोडतो मणिपर्वत , कुबेरपर्वत हा भाग उत्खननासाठी खुला केला आणि तिथल्या नागेश्वर मंदिराच्या पाठीमागे असलेला टेकाड पोखरला तर सारनाथ च्या तोडीचे अशोक कालीन शिल्प सापडेल हे कुठल्याही पुरातत्व शाखेचा विद्यार्थी सांगेल असे खुद्द कुलकर्णी म्हणतात. त्यांचे हे वक्तव्य का होते, तर ह्यूनत्सांग आणि फाहीयान यांच्या प्रवास वर्णनात त्याचा स्पष्ट उल्लेख आहे.
माननीय सुप्रीम कोर्टाचा आदेश सर्वमान्य आहे. माननीय सुप्रीम कोर्टाचा आदर करून,
हा पूरातत्व अभ्यासाचा लेख प्रसिद्ध करण्या चा उद्देश तिथे बौद्ध स्तूप, राम मंदिर किंवा मशीद यापैकी कोणत्याही धार्मिक स्थळांना समर्थन करत नाही. पण अयोध्येत सपाटीकरण करत असताना त्या ठिकाणाहून सापडत असलेले पूरातत्व वस्तूंचा पूरातन (पूरातत्व) विभागाकडून अभ्यास होणं खूप गरजेचे आहे. आता पुन्हा अवषेशांच्याद्वारे मिळणाऱ्या माहीतीने निर्णय होणे खूपच महत्वाचे आहे.
यामुळे जनतेमध्ये जी काही किंतु, परंतु निर्माण झालेला आहे, आणि ऐतिहासिक सत्त्य लपविले जात आहे याच निरसन नक्कीच होइल. यामुळे सामाजिक बांधिलकी, सामाजिक सलोखा, बंधुत्व दृढ होइल यात शंका नाही.
आपली संविधानिक न्यायव्यवस्था ही पूर्णपणे पुराव्यांवरती(evidences)
वरती कामं करते, त्यामूळे मिळालेल्या अवषेश असलेले पूरावे तपासणे आणि त्या अनुषंगाने निर्णयप्रक्रिया राबवणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. याकरीता आम्हास मिळून पुन्हा सुप्रिम कोर्टाला अवाहन करावे लागणार आहे.
डॉ देवानंद उबाळे
0 Comments