ज्यांच्या नावे घर व नमुना नंबरआठ नसेल त्यांनाही शौचालय.;
ग्राम  पंचायत विस्तार अधिकारी ---कट्टेवार

ग्राम पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी कट्टेवार यांचा जावई शोध घर व नमुना नंबर 8 नसलेले लाभार्थी बांधणार शासकीय रस्त्यावर शौचालय.
देवणी:तालुक्यातील नागराळ येथील सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमत करून गावातील काही शासकीय कर्मचारी व काही पेन्शन धारक व काहींच्या नावे घर किंवा नमुना नंबर 8ला नोंद नसताना त्यांच्याशी आर्थिक गैरव्यवहार करून त्यांचे दहा पाच वर्षपूर्वीचे शौचालय दाखवून एकूण  सोळा लाभार्थ्यांचे एकूण  एक लाख ब्यांनव हजार रुपयेचे बोगस बिलं काढून लाखो रुपये चा भ्रष्टाचार केल्या प्रकरणी नागराळ येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश ऐनिले नागराळ येथील ग्राम पंचायतीच्या पुढे दि 18 मे रोजी आमरण उपोषणाला बसले आहेत शौचालय बिलं भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी करण्यासाठी गटविकास अधिकारी देवणी यांच्या आदेशावरून  आले व सदर उपोषण कर्त्याशी चर्चा करीत असताना आत्ता शौचालय घेण्यासाठी घर किंवा नमुना नंबर 8 असणे बंधनकारक नाही मागेत त्यांना शौचालय शासन देणार आहे असे सांगून त्या आदेशाचे परिपत्रक मी तुम्हाला आणून देतो असा जावई शोध लागला आहे  आत्ता खरंच शासकीय परिपत्रक असे असेल तर आत्ता सर्वांना शासकीय जागेत किंवा रस्त्याच्या कडेला सर्वसामान्य लोकांना शौचालय बांधून मिळणार आहे  प्रत्येक घरातील लोकांकडून शौचालय ची मागणी केली जात आहे घरकुल व शौचालय साठी जागा असणे बंधनकारक असताना नमुना नंबर 8 ची गरज नाही म्हणून लोकांची प्रशासनाची दिशाभूल करणे हे कितपत योग्य आहे संबंधित सरपंच ग्रामसेवक यांनी केलेल्या  भ्रष्टाचारावर पांघरून घालणे आहे सदर चौकशी ही प्रशिक्षित अनुभवी विस्तार अधिकारी यांच्याकडून करावी अशी मागणी उपोषण कर्ते सुरेश सुभाष ऐनिले यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे  सरपंच व ग्रामसेवक यांनी मंजूर करण्यात आलेल्या यादीत शासकीय कर्मचारी यांचा समावेश केला आहे शासनाच्या कर्मचाऱ्यांना शौचालय असणे बंधनकारक आहे शौचालय प्रमाणपत्र शासनाला दिल्याशिवाय त्यांच्या पगारी होत नाहीत ही साधा नियम ग्राम पंचायत विस्तार अधिकारी यांना माहिती नाही तर शासकीय कर्मचारी याना शौचालय देण्याचा प्रश्नच कसा उदभोवतो  ही केवळ शासनाची दिशाभुल आहे  विस्तार अधिकारी हे केवळ ग्रामसेवक यांचे बाहुले दिसायला लागले आहेत  यांच्याकडून निःपक्षपाती पणे चौकशी होणे शक्य नाही सदर प्रकरणात चौकशी समिती नेमून दोषींवर कारवाई करण्याची मागणी सुरेश सुभाष ऐनिले यांनी केली आहे