लोकडाऊनच्या काळात कोरोणाची भीती दूर ठेवत  
डॉ सुभेदार दाम्पत्याने दोन हजार रुगणांची केली आरोग्य तपासणी 

महिला रुग्णांना लौकडाऊनच्या काळात मोठा दिलासा 

मुखेड/ प्रतिनिधी 
राज्यात कोरोनाचा वाढता प्रसार आणी दिवसेंदिवस वाढत असलेली रुग्ण संख्याचे संक्रमणाचे प्रमाण आणि डाँकटर्स व प्यारा मेडिकल कर्मचारी यांंना होत असलेली कोरोनाची लागण त्यामुळे बाधेचा विचार न करता कुटुंब परिवार मुलबाळ यांची तमा चिंता अजिबात न बाळगता रुग्ण हेच दैवत माणून सर्व गोष्टी दुर्लक्षीत करून मुखेडचे बालरोगतज्ज्ञ आणि प्रख्यात स्त्रीरोग तज्ञ 
                     डॉ. माधवी सुभेदार भोसले
 
                 डॉ वेंकट सुभेदार भोसले
यां दोन दांपत्यांंनी एक ही  दिवसाची विश्रांती न घेता न घाबरता तबबल दोन हजार रुग्णवर उपचार करून आरोग्य ची काळजी घेऊन आपले कर्तव्य चोखपणे बजावले आहे या डाँँक्टर दाम्पत्याचे  तालुक्यात सर्वत्र कौतुक केले जात आहे.
राज्यात कोरोना आजाराचा शिरकाव होताच कोरोनाशी लढा देण्यासाठी डाँकटर्स मंडळी सरसावली स्वतःचे जीव धोक्यात घालून डाँकटर्स अहोरात्र रुग्णांची सेवा करत औषध उपाचार करीत आहेत या मुळे एकीकडे आजाराचा वाढता प्रादुर्भाव पाहता चिंताग्रस्त वातवरण असताना डाँकटर्सच्या शर्थीचे प्रयत्नामुळे हजारो रुग्णांचे प्राण वाचत असून ठणठणीत होऊन घरी परतत आहेत. 
ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार सुरू होण्याच्या भीतीने अनेक डाँकटर्स मंडळीने आपलं बाह्यरुग्ण उपचार कक्षास कुलूप लावून रुग्ण तपासणी बंद केली आहे तर काही जण जिल्ह्याचे ठिकाण गाठून घरी सुरक्षित राहणे पसंद केले  
या अश्या बिकटवेळी बालरोगतज्ज्ञ डॉ वेंकट सुभेदार आणि स्रीरोग तज्ञा डॉ माधवी वेंकट सुभेदार यांनी  रुग्णांसाठी संकटमोचक म्हणून धाव घेत कशाचीही परवा न करता
 बाह्यरुग्ण विभाग नियमित सुरूच ठेवला व बिनधास्त रुग्ण तपासणी केली. साधारणपणे मार्च महिन्यात 650 एप्रिल महिन्यात 600 आणी मे महिन्यात 750 असे  एकूण दोन हजार रुग्णवार त्यांनी उपचार केले आहे. यात गरोदर माता बाल रुग्ण व इतर किरकोळ आजारांचा समावेश आहे .
डॉ वेंकट सुभेदार हे आय. एम. ए. मुखेडचे अध्यक्ष आहेत व क्रषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आहेत. तर डॉ माधवी भोसले ह्या माजी नगरसेवक असून त्या शिक्षण संस्थेचे मुख्य संचालक ही आहेत  सामाजिक कामाची आवड असलेले या डाँकटर्स  दाम्पत्याने कोरोनाच्या भीतिने गर्भित झालेल्या नागरिकांना दिलासा देत त्यांच्यात विश्वास निर्माण करून रुग्ण सेवा केली आहे. 
सकाळी 9 च्या ठोक्याला सुरू होणारा हा बाह्य रुग्ण विभाग दुपारी 03 पर्यन्त माणिक हॉस्पिटल मध्ये चालतो मुखेडला  स्त्री रोग तज्ञांची कमतरता असल्याने स्त्रीयांच्या विविध आजार साठी रुग्णांना नांदेड अथवा उदगीर लातूर येथे जावे लागत असे पण उस्मानिया विद्यापीठाची पदवी प्राप्त असलेल्या डॉ माधवी सुभेदार यांंनी मुखेड सारख्या ग्रामीण भागात  महिलांंच्या आजारा बाबतीत योग्य निदान  करीत तपासणी करून महिलांंचे आरोग्य जपले आहे.यामुळे तालुका भरातील महिलांंची मोठी सोय झाली आहे .
या डाँकटर्स दाम्पत्याने लोकडाऊन काळात सार्वजनिक वाहतूक सेवा बंद असल्या काळात कुठलीही गैरसोय रुग्णांची न होऊ देता विक्रमी संख्येने रुग्णावर उपचार करून एक आदर्श निर्माण केला आहे. 
त्यांच्या धाडसी कार्याचे कौतुक होत असून आज घडीला मुखेड शहरातील 70 टक्के  खाजगी  रुग्णलये कोरोना संसर्गच्या भीतीने बंद असताना उपजिल्हारुग्णल्यात डाँकटर्स आणि नर्सला कोरोनाची बाधा झाली असताना वैद्यकीय क्षेत्रात  भयभीत  वातवरण आसतांनाही या दाम्पत्याने रुग्णांची या काळाततील आरोग्य सेवा ही कौतुकास्पद ठरत आहे. आशा या देवरूपी डॉक्टर दांपत्यांंना बि.टि.व्हि.न्यूज महाराष्ट्रच्या वतीने त्यांच्या कार्याला सलाम..!!

              BTV NEWS MAHARASHTRA