कोरोना जनजागृती आणि वाढती बेरोजगारी

आज हा लेख लिहावासा वाटला कारण कुठे पहाल तिकडे कामगार आणि कामगार हा विषय चालू आहे .
आज कोरोना सारख्या आजारांने प्रत्येकाची जागा दाखवून दिली आहे तर महाराष्ट्रातील परप्रांतीय कामगार स्वगृही परतत आहेत त्यामुळे येणार्या  काळात 
मराठी कामगारांसाठी आणि व्यावसायिकांसाठी सुवर्ण संधी निर्माण होत आहेत त्यामध्ये 
ड्राइवर, पेंटर, कार मॅकेनिक, ac मॅकेनिक
प्लंबर, सीसीटीव्ही कैमरा असेंम्बल्ड, सुरक्षा कर्मचारी, हाऊस किपिंग , कॉम्पुटर सर्व्हिस, केअर टेकर, नर्सेस
बिल्डिंग मटेरियल सप्लाय, ट्रान्सपोर्ट व्यवसाय, वॉटर सप्लाय, गॅरेज, इलेट्रीकल हार्डवेअर दुकान पाणी पुरी 
कामे इत्यादी वर जे परप्रांतीय लोकांची मक्तेदारी होती ती आपल्याला मोडून काढायची आहे.. व्यवसाय उद्योग छोटा असो किंव्हा मोठा तो महाराष्ट्रात मराठी माणसाने हे व्यवसाय करण्यासाठी पुढे यावे पण यामध्ये एक नमूद करतो आपला मराठी माणूस याच्या मध्ये कुठे मागे रहातो तर आपल्या मराठी माणसाला कमी वेळात भरभक्कम पैसा हवा असतो आणि आठवड्याला सुट्टी हवी असते कोणत्याही कामाचे मोजकेच तास हवेत वर्षाच्या 365 दिवसात दररोज एक सण येतो तो साजरा करण्यासाठी त्या निवडक सणामध्ये 5 दिवस ते 10 दिवस सुट्टी हवी असते आणि जर समजा सुट्टी नाहीच मिळाली तर दांडी मारायची हे सर्व गुण परप्रांतीय कामगारा मध्ये नसतात त्यामुळे मिळेल त्या तुटपुंजा पगारात आणि जास्तीत जास्त तास काम ते काम मुबलक मोबदल्यात करतात त्यामुळे मराठी माणसांपेक्षा परप्रांतीय कामगारांना पहिली पसंती मिळते आणि एक म्हणजे ते परप्रांतीय कामगार पाणीपुरी ते दारोदार फिरून कुल्फी विकण्यापर्यंत कधीच लाजत नाही त्यामुळे ते यशस्वी होत जातात आणि काहीच कालावधीत जास्त पैसा कमवून ते आपला स्वतःचा उद्योग धंदा सुरू करतात आणि आपला मराठी माणूस त्याच्या कडे काम करतो पण आता  वरील सर्व व्यवसाय स्वतः सुरवात करून मराठी माणसाने परप्रांतीय कामगारांना आळा घातला पाहिजे थोडे काही दिवस मेहनत केली तर भविष्यात मेहनतीचे फळ चांगलेच मिळेल हे मनात पक्के घट्ट करून सर्व मराठी माणसाने एकत्र येत महाराष्ट्रातील उद्योगधंद्यात मराठी माणूस कुठेही कमी पडता कामा नये यासाठी सर्व स्तरातील मराठी माणसाने नवीन होतकरू तरूणांना पुढे येण्यासाठी प्रोत्साहन दिले तर भविष्यात दिल्ली ला महाराष्ट्रा पुढे झुकावे लागेल पण हे सर्व योग्य नियोजन बध्द झाले तर नक्कीच होईल आज महाराष्ट्रातील मुंबई पुण्यासारख्या प्रांतामधून सुध्दा बरेच कामगार हे महाराष्ट्रातील ग्रामीण भागाकडे वळत आहेत तेंव्हा कोरोना सारख्या आजारात सुध्दा या कामगारांना गावात विशिष्ठ प्रकारचे नियोजन करून फिजिकल डिस्टिन्सिंग चे पालन करत कोरोना ला हद्दपार करण्यास सर्वांनी मिळून एकत्र येऊया आणि मराठी माणसाला हक्काचा उद्योगधंदा मिळवून देऊया..!! 
 
              सुर्यकांत कांबळे
 संस्थापक अध्यक्ष स्वराज्य युवा संघटना