उद्योग वाढीसाठी काशी ते कलकत्ता रस्त्याचे निर्माण
--------------------------------------------------
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या दुर  दृष्टीतुन साकारलेला ग्रँड राजमार्ग

भारताच्या इतिहासात अनेक राजे महाराजे सरदार सुभेदार तसेच कर्तबगार स्त्रिया झाल्या इतिहासाने त्यांच्या कार्याची दखल घेतलेली असुन वर्तमान काळातील समाजव्यवस्था त्या दखलपात्र स्त्रियांचा आदर्श घेवुन सामाजिक जिवन सुधारण्याचा प्रयत्न करीत आहे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी होळकर रिसासतीमधील अनेक वस्तु आयात निर्यात करण्यासाठी उद्योग व्यवसायाला तसेच त्यांच्या सुविधांना महत्व देवुन उद्योग बळकटीसाठी रस्ते निर्माण केले "अ शार्ट हिस्टोरी आँफ इंडिया चे लेखक हरप्रसाद चौधरी "लिहतात कि वाराणसी (काशी)ते कलकत्ता ग्रँट ट्रक रस्ता निर्माण करुन उद्योग धोरणाला अहिल्यादेवीनी चालना देवुन रोजगाराच्या संधी निर्माण केल्या बैलगाड्यातुन होणा-या व्यवसायासाठी आणि व्यवसाय करणा-या व्यावसायिकांची व्यवस्था अहिल्यादेवींनी करुन उद्योग निती सशक्त केली यातुन उद्योग व्यवसायाला चालना मिळाली होळकर रियासतीमध्ये उत्पादीत होणारा माल वाराणसी कलकत्ता बंदरामधुन तो विलायतेला जात होता
या रस्त्यावर पुलाची निर्मीती करुन विना अडथळा कोणीही प्रवास करु शकत होता म्हणुन त्यास राजमार्ग म्हटले जात असे दळणवळण व तिर्थयात्रेसाठी दुवा ठरणारा रस्ता आर्थिक विकासाचा केंद्रबिंदु होता याच रस्त्यावरुन व्यापारी तसेच तिर्थयात्रेकरु मोठ्या प्रमाणावर मार्गस्त होवु लागल्याने अनेक सुखसुविधा अहिल्यादेवीनी पुरवुन त्याकाळातल्या उद्योग व्यवसायाला दोन राज्याशी जोडुन व्यावसायिकांना संधी निर्माण करुन देण्याचे काम केले यातुन होळकर रियासतीमध्ये मोठा महसुल जमा होत होता
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची 395वी जंयती साजरी होत असुन त्यांच्या आदर्श राज्यकारभारातील  उत्कृष्ट नितीस मानाचा मुजरा.

     अहिल्यामाई होळकर यांच्या जयंती निमित्त सर्व                 मुळनिवासी  बांधवाना हार्दिक-हार्दिक शुभेच्छा...!
           BTV NEWS MAHARASHTRA