उदगीर उत्पन्न बाजार समिती कांहीं दिवसांसाठी बंद
-सभापती सिध्देश्‍वर पाटील

उदगीर / प्रतिनिधी : सध्या उदगीर शहरामध्ये कोरोनाची संख्या पंचवीस पर्यंत गाठली असून शहरातील व ग्रामीण भागातील विविध ठिकाणी कोरोनाचे रूग्ण केवळ एकमेकाच्या संपर्कामुळे वाढले आहेत. याची खबरदारी म्हणून उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी व शेतकर्‍यामध्ये सोशल डिस्टंसींगच्या नियमाचे उल्लघंन होत असल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्य पहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सभापती सिध्देश्‍वर पाटील यांनी कांही दिवसा करीता बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार बंद होते. यामुळे जनतेला आर्थीक संकटाचा सामना करावा लागला. कोरोना महामारी संसर्गजन्य रोग असल्यामुळे दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्ती एकमेकांच्या संपर्कात आल्यास कोरोना होण्याची भिती आहे म्हणून केंद्र सरकारने गेली दोन महिने लॉकडाऊन केले होते. पण रोगाविषयी जनतेमध्ये जनजागृती करून घरच्या बाहेर पडते वेळेस तोंडाला मास्क लावणे किमान पाच फूटाच्या अंतरावरून एकमेकाशी संपर्क करणे, सोबत सॅनिटाझरचा वापर करणे, काम असेल तरच घरच्या बाहेर पडणे आदी शासनाने घालून दिेलेले नियम पाळणे गरजेचे आहे. पण अनलॉक झाल्यापासून दैनंदिन व्यवहार सुरु झाले असून नागरीक पुन्हा पूर्वीप्रमाणेच वावरण्यास सुरुवात केले आहे. कांही ठिकाणी शासनाच्या नियमाचे पालन केले जात आहे तर कांही ठिकाणी याचे पालन केले जात नाही. विशेष म्हणजे शासकीय जागेत याचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे पण नागरीकांकडून पालन केले जात नाही.
उदगीर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती चालू करते वेळेस लातूर जिल्हाधिकारी यांच्या वतीने नियम अटी घालून चालू करण्यास परवानगी दिली होती. लॉकडाऊन शिथील केल्यामुळे एक -दिड महिन्याखाली कृषी उत्पपन्न बाजार समितीमध्ये पहिल्याच दिवशी शसानाच्या नियमाचा फज्जा उडाला होता यामुळे तेंव्हा कांही दिवसासाठी बंद करण्यात आली होती. यावेळेस ही शासनाने घालून दिेलेल्या नियमाचे पालन होत नसल्यामुळे व एका व्यापार्‍याच्या आडतीवर ग्रामीण भागातील ५० ते १०० लोक संपर्कात येत असल्यामुळे कोणाच्या माध्यमातून कोणास कोरोना होईल याची भिती निर्माण झाली (पान ३ वर) होती. यासाठी सहाय्यक निबंधकच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीस पत्र देऊन व बाजार समितीने व्यापार्‍यांना वारंवार सूचना करूनही त्याचे पालन होत नाही यासाठी बाजार समितीने योग्य तो निर्णय घ्यावा अशी माहिती जळकोट तालुक्याचे वाघमारे यांनी दै. एकजूट लोकजागृतीशी बोलताना म्हणाले.
याविषीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिध्देश्‍वर(मुन्ना) पाटील यांच्या संपर्क साधला असता ते म्हणाले की व्यापारी व शेतकर्‍यांस वेळवेळी शासनाच्या नियमाचे पालन करण्यास सांगूनही पालन होत नाही व लोकांमध्ये जागृती होत नसल्यामुळे येथून कोरोनाचा प्रसार होऊ नये व जास्त कोरोनाचे रूग्ण वाढू नये याची काळजी घेत कांही दिवसासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय सभापती सिध्देश्‍वर पाटील यांनी घेतला यामुळे व्यापारी व शेतकरी स्वत: अडचणीत येणार आहेत. याचसोबत इतर ठिकाणीही बाजारामध्ये अशीच अवस्था असल्यामुळे उदगीर शहरात व ग्रामीण भागात कोरनाचे रूग्ण केवळ एक मेकाच्या संपर्कामुळे वाढत चाललेले आहेत यामुळे पुन्ही लॉकडाऊन करावे लागते कि काय? अशी एकदा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भविष्यवाणी केली होती. त्यामुळे नागरीकांत संभ्रण झाला होते.

       वाचत रहा..! पहात रहा...!! अपडेट रहा...!!!

महाराष्ट्रातील सत्य घडामोडींचा वेध घेण्यासाठी शेती आणी शेतक-यांच्या हितासाठी सदैव तत्पर आसलेले न्यूज चैनल बि.टि.व्हि.न्यूज महाराष्ट्र चैनलला सबस्क्राईब करा..व बेल आयकॉन दाबून बातमीला लाईक जरूर करा व शेर करायला विसरू नका.. हेच शेतकऱ्यांना व या चैनलला प्रोत्साहन मिळेल व आपली व महाराष्ट्राची सेवा जोमाने करता येईल.


         BTV NEWS MAHARASHTRA