ऑनलाईन शिक्षणासाठी फोन कुठून आणू व्हय सायब..!

सातारा / प्रतिनिधी : संपूर्ण देशामध्ये कोरोना सारख्या
महाभयंकर रोगाने थैमान घातले आहे.लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.लोकांना एकवेळचे अन्न पण मिळने मुश्कील झाले आहे.आणि सरकारने ऑनलाईन शिक्षण पद्धती चालू केली आहे. आता जे लोक श्रीमंत आहेत ते एक काय कितीही मोबाईल घेऊ शकतात.पण जिथं एकवेळच्या जेवणाची चिंता आहे तिथे मोबाईल आणायला पैसे कुठून आणणार साहेब! ही आर्त हाक आहे गोरगरीब सामन्य जनतेची.बरं मोबाईल जरी घेतला उसना कुणाकडून त्याला परत इंटरनेट आले.त्याला परत पैसे ?
इथे लोक 10 रु वडापाव खाऊन जगतायात आणि इंटरनेट साठी कुठून पैसा आणायचं ते ही एक प्रश्नच आहे. नाहीतर सरकारने मोबाईलसाठी अनुदान दयावे आणि इंटरनेट पण सरकारी कंपनी कडून मोफत दयावे आणि लहान मुलांची तेवढी क्षमता पण नाही की सलग २-३ तास मोबाईल बघावा आणि बघितलाच तर काय गॅरंटी आहे की त्यानां शिकवलेलं समजले असेल? म्हणून सरकारने ऑनलाईन शिक्षणाचा निर्णय एकतर मागे घ्यावा नाहीतर ऑनलाईन शिक्षणासाठी अनुदान दयावे , अशी मागणी माहिती अधिकार आणि पत्रकार समिती सातारा जिल्हा सचिव .श्री.ओंकार घोडके यांनी मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री यांच्याकडे केली आहे


      वाचत रहा..! पहात रहा...!! अपडेट रहा...!!!

महाराष्ट्रातील सत्य घडामोडींचा वेध घेण्यासाठी शेती आणी शेतक-यांच्या हितासाठी सदैव तत्पर आसलेले न्यूज चैनल बि.टि.व्हि.न्यूज महाराष्ट्र चैनलला सबस्क्राईब करा..व बेल आयकॉन दाबून बातमीला लाईक जरूर करा व शेर करायला विसरू नका.. हेच शेतकऱ्यांना व या चैनलला प्रोत्साहन मिळेल व आपली व महाराष्ट्राची सेवा जोमाने करता येईल.


         BTV NEWS MAHARASHTRA