इकडे आड... तिकडे विहीर...!!
सर्व सामान्य व्यक्ती हफ्ते कसेतरी भरणार..! पण व्याज माफ करावे..
सुशांतभाऊ गोरवे युवा अध्यक्ष एन.एस.पी.यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई / प्रतिनिधी : राज्यात कोरोनाने हैराण झालेल्या लघु उद्योजक, छोटे मोठे व्यापारी आपल्या व्यवसायासाठी बँक, सोसायटी,फायनान्स, खाजगी सावरकर यांच्या कडून कर्ज घेतली होती त्याचे हफ्ते कोरोनामुळे लाँकडावून मध्ये आडकलेला हा घटक आपले हफ्ते भरु शकले नाहीत परंतु ह्यांना हफ्ते भरण्याचा तगादा मात्र मागे लागल्याने इकडे आड... तिकडे विहीर...!! आशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सर्व सामान्य व्यक्ती हफ्ते भरणार..! पण व्याज माफ करावे..
सुशांतभाऊ गोरवे युवा प्रदेश अध्यक्ष नँशनल सोशालिस्ट पार्टी महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.उध्दव ठाकरे साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.गरीब जनतेने आत्माहत्याच करायला पाहिजे काय फायनान्सवाल्यांच्या पायी आसा सवाल उपस्थित केला आहे.लाँकडाऊनच्या काळामध्ये हप्ते कालावधी वाढ करून दिली मात्र हप्ते झाले पाच हजाराचे परंतु त्याला व्याज मात्र दहा हजार कोणत्या नियमामध्ये बसतात हा प्रकार काही कळायला मार्ग नाही.
मग ते हप्तेच भरलेले परवडले असते ना सरकार साहेब,,
जर असेच होणार असेल तर जनता हफ्ते कशी भरणार आदी विषयी सरकारने यावर विचार करायला हवा आणि व्याज न लावता फक्त हप्तेच भरले जातील  अशी व्यवस्था करून सर्व सामान्य वर्गाला जगण्याचे बळ द्यावी आशी मागणी नैशनल सोशालिस्ट पार्टी युवकांच्या वतीने प्रदेशाध्यक्ष सुशांतभाऊ गोरवे यांनी केले आहे. 

      वाचत रहा..! पहात रहा...!! अपडेट रहा...!!!

महाराष्ट्रातील सत्य घडामोडींचा वेध घेण्यासाठी शेती आणी शेतक-यांच्या हितासाठी सदैव तत्पर आसलेले न्यूज चैनल बि.टि.व्हि.न्यूज महाराष्ट्र चैनलला सबस्क्राईब करा..व बेल आयकॉन दाबून बातमीला लाईक जरूर करा व शेर करायला विसरू नका.. हेच शेतकऱ्यांना व या चैनलला प्रोत्साहन मिळेल व आपली व महाराष्ट्राची सेवा जोमाने करता येईल.


         BTV NEWS MAHARASHTRA