सहकारी बँकाचे कार्य उल्लेखनीयच..!!
--- विजयकुमार मानकरी
----------------------------------
लातूर / प्रतिनिधी : रिझर्व्ह बँकांच्या मार्गदर्शक तत्वावर चालणाऱ्या सहकारी बँकाचे कार्य उल्लेखनीयच असल्याचे मत  शिद्धेश्वर सहकारी बँकेचे संचालक आसलेले उद्योगपती विजयकुमार मानकरी यांनी व्यक्त केले सर्वसामान्य माणूस हा बेरोजगार आसताना व शेतकरी, उद्योजक, लघु उद्योजक यांना केंद्रबिंदू मानून सहकारी बँका कार्य करीत असतात. शेतकऱ्यांना कर्ज देणें म्हणजे देश जगवणे होय त्यांची परतफेड करून घेणे लघुउद्योगाना कर्ज देणे त्यांच्या उद्योगांना चालना देणे होय बेरोजगारांना कर्ज देऊन त्यांना स्वावलंबी बनवणे होय एकंदरीत सहकारी बँका  ह्या तळागाळातील लोकांच्या स्वावलंबनासाठी झटणाऱ्या आहे इतर बँकांच्या तुलनेत  सहकारी बँका चे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले  बँकांच्या सहकार्याने अनेकांचे संसार उभे राहतात अनेकांना जगण्याच्या जाणिवा मिळतात येथे त्यांच्या कर्तव्याला महत्व देऊन कर्जपुरवठा करीत त्यांना जिवन जगण्याची स्फुर्ती देतात असे सहकारी बँकेचे महत्त्वाचे कार्य असल्याचे मत शिद्धेश्वर सहकारी बँकेचे संचालक उद्योजक  विजयकुमार मानकरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले  ग्राहक व व्यावसायिकाचे मने जिंकून त्यांना तत्पर सेवा देऊन सहकार क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणली आहे  सारस्वत बँक  जागतिक सर्वेत अव्वल ठरली आहे देशात पहिला जगात दुसरा नंबर मिळवण्याचा बहुमान पटकावला आहे त्या सहकार क्षेत्रातील सर्वच बँका सर्वोकृष्ठ ठरत आहेत " सहकारा विना नाही उद्धार"   स्पर्धात्मक युगात सहकारी बँकाचे काम नेत्रदीपक असल्याचे मत शिद्धेश्वर सहकारी बँकेचे संचालक श्री विजयकुमार मल्लिकार्जुन मानकरी सावकार यांनी  व्यक्त केले विजयकुमार मानकरी सावकार पुढे म्हणाले की 
ग्राहकांचाअधिक विश्वास , मुभलक सेवा ,योग्य शुल्क आकारणी , डिजिटल सेवा, वित्तीय सल्ला, अशा तत्पर सेवा सहकारी बँका देत असल्यामुळे ग्राहकाचे व व्यावसायिक यांचे जीवनमान उंचविण्यासाठी सहकारी बँकांचे मोठे योगदान लाभले आहे ह्या सहकारी बँकामुळे सर्वसामान्य लोकांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडून येत आहे असेही मत विजयकुमार मानकरी यांनी सांगितले सहकारी बँका अर्थतज्ञाच्या मार्गदर्शना मुळे आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आसल्याचे  मानकरी  यांनी सांगितले.   
        सहकारी बँका च्या संचालक मंडळात अनेक अर्थ तज्ञ असल्यामुळे सहकारी बँका ह्या  सक्षम होऊन अनेक स्पर्धात्मक बँकापेक्षा आघाडीवर आहेत  यांचेच उदाहरण म्हणून सारस्वत बँकेचे घेता येईल असेही विजयकुमार मानकरी यांनी सांगून ग्रामीण व शहरी भागात या सहकारी बँकाचे कार्यक्षेत्र शाखांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे सहकारी बँकात सर्व मराठवाड्यात सर्वोत्तम सेवा देत आहे  या सर्वच सहकारी बँकात तज्ञ  मार्गदर्शकामुळे  सर्व बँका  यशस्वी वाटचाल करीत असल्याचे विजयकुमार मानकरी यांनी सांगितले आहे.

     वाचत रहा..! पहात रहा...!! अपडेट रहा...!!!

महाराष्ट्रातील सत्य घडामोडींचा वेध घेण्यासाठी शेती आणी शेतक-यांच्या हितासाठी सदैव तत्पर आसलेले न्यूज चैनल बि.टि.व्हि.न्यूज महाराष्ट्र चैनलला सबस्क्राईब करा..व बेल आयकॉन दाबून बातमीला लाईक जरूर करा व शेर करायला विसरू नका.. हेच शेतकऱ्यांना व या चैनलला प्रोत्साहन मिळेल व आपली व महाराष्ट्राची सेवा जोमाने करता येईल.


         BTV NEWS MAHARASHTRA