मराठा आरक्षणामुळे मराठा समाजातील १२७ तरुण झाले अधिकारी..

मुंबई / प्रतिनिधी : काल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०१९ निकाल जाहीर केला. यामध्ये मराठा समाजातील १२७ तरुण अधिकारी झाल्याची माहिती मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई लढणारे विनोद पाटील यांनी दिली आहे...
औरंगाबाद-मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच एमपीएससीच्या भरतीमध्ये मराठा समाजातील १२७ तरुण अधिकारी झाल्याची माहिती मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई लढणारे विनोद पाटील यांनी दिली आहे.
राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू केल्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच एमपीएससीच्या पदभरतीमध्ये मराठा समाजातील उमेदवारासाठी जागा राखून ठेवल्या गेल्या. राज्य सरकारने मराठा समाजाला सामाजिक आणि आर्थिक मागास वर्गात नोकरीत १३ टक्के आरक्षण लागू केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं १३ ते १५ जुलै २०१९ या दरम्यान मुंबई, औरंगाबाद, नागपूर आणि पुणे या परीक्षा केंद्रावर ४२० पदांसाठी राज्यसेवा मुख्य परीक्षा घेतली होती. एका वर्षानंतर शुक्रवारी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. हा निकाल आणि प्रत्येक प्रवर्गासाठी शिफारसपात्र ठरलेल्या कट ऑफ मार्क्स आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
काल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०१९ निकाल जाहीर केला. 'मराठा आरक्षणामुळे जवळपास १२७ तरुण विद्यार्थी अधिकारी झाले. हे यश छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा घेऊन रस्त्यावर उतरलेल्या सर्वांच आहे. हे यश ५० पेक्षा अधिक तरुणांनी बलिदान दिलं त्यांच आहे. यावरच आपली लढाई थांबलेली नाही, अनेक जण उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, शिक्षणाधिकारी झाले. सर्वोच्च न्यायालयामध्ये हे आरक्षण टिकवणे ही राज्य सरकारची आणि विरोधी पक्ष या दोघांची जबाबदारी आहे .आज हे अधिकारी बघितल्यानंतरमराठा आरक्षण मिळाल्याचा आनंद अधिक आहे', असं विनोद पाटील यांनी सांगितले .
१- डेप्युटी कलेक्टर-१३

२- डी. वाय.एस.पी.-११

३-असिस्टंट कमिशनर सेल टॅक्स-३

४-डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर-६

५- असिस्टंट डायरेक्टर महाराष्‍ट्रा फायनान्स अँड अकाउंट सर्विस-२

६-डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीज-१

७-तहसीलदार-२२

८-डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर महाराष्ट्र सर्व्हिस-१२

९-असिस्टंट रीजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर-१

१०-विभाग अधिकारी-६

११-असिस्टंट ब्लॉग डेव्हलपमेंट ऑफिसर-२

१२-भूमी अभिलेख उपअधीक्षक-३

१३- राज्य अधीक्षक उपअधीक्षक-२

१४-उद्योग अधिकारी-तांत्रिक-९

१५-सहाय्यक प्रकल्प अधिकारी-राज्य अधिकारी- प्रशासन अधिकारी-निबंधक-१

१६-नायब तहसीलदार-३३

राज्य सेवा-पूर्व परीक्षा १७ फेब्रुवारी २०१९ रोजी मुंबईसह अन्य ३७ जिल्हा केंद्रांवर घेण्यात आली होती. पूर्व परीक्षेकरता ३ लाख ६० हजार ९९० उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. या परीक्षेमधून राज्य सेवा-मुख्य परीक्षेकरता ६ हजार ८२५ उमेदवार अर्हताप्राप्त ठरले होते. ही मुख्य परीक्षा १३ ते १५ जुलै २०१९ दरम्यान मुंबई, औरंगाबाद, नागपूर आणि पुणे येथे घेण्यात आली होती. लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीसाठी १ हजार ३२६ उमेदवार अर्हताप्राप्त ठरले. यात मराठा समाजातील १२७ तरुण अधिकारी झाले आहेत...

      वाचत रहा..! पहात रहा...!! अपडेट रहा...!!!

महाराष्ट्रातील सत्य घडामोडींचा वेध घेण्यासाठी शेती आणी शेतक-यांच्या हितासाठी सदैव तत्पर आसलेले न्यूज चैनल बि.टि.व्हि.न्यूज महाराष्ट्र चैनलला सबस्क्राईब करा..व बेल आयकॉन दाबून बातमीला लाईक जरूर करा व शेर करायला विसरू नका.. हेच शेतकऱ्यांना व या चैनलला प्रोत्साहन मिळेल व आपली व महाराष्ट्राची सेवा जोमाने करता येईल.


         BTV NEWS MAHARASHTRA