शेतकरी बांधवांनो पुनरपेरणी करताय विचार करा...!!

मुंबई / प्रतिनिधी : सोयाबीन पेरून उगवण कमी आल्यानंतर काही शेतकरी त्या शेतात पुन्हा पेरणी करतील.
परंतु आधीच्या सोयाबीन पेरणी नंतर प्री इमर्जन्स स्ट्रॉंगआर्म किंवा ईतर तणनाशक संबंधित शेतात फवारलेले असल्यास त्या शेतात पुन्हा सोयाबीन पेरणी करता येईल. इतर पिके पेरता येत नाहीत. कारण त्या तणनाशकाचा अंश 80 ते 90 दिवसांपर्यंत शेतात शिल्लक राहतो. त्या शेतात कापूस किंवा कोणते एकदल पिक  पेरणी केल्यास त्याची उगवण होणार नाही याबाबत संबंधितांना जाणीव करून द्यावी.

ज्यांनी प्री इमर्जन्स तणनाशक फवारलेले नाही तर त्यांनी दुसरे पीक लावण्यास हरकत नाही,
सोयाबीन पेरणी नंतर ७२ तासाच्या आत ज्या शेतकऱ्यांनी वरील ऊगवण पुर्व  pre emargance तणनाशकाची फवारणी केली आहे व त्या शेतातील सोयाबीन ऊगवण झाली नसेल तर परत त्या शेतात फक्त सोयाबीन च पेरावे लागेल कापुस मका ज्वारी पेरता येणार नाही कारण त़णनाशकाचे अवशेष ८०  ९०  दिवस राहतात  ते ईतर पिकाची ऊगवण होउ देणार नाही,
या महत्त्वाच्या तांत्रिक बाबींची माहीती सर्व विक्रेत्यांनी शेतकर्यांना जरुर द्यावी संकटात सापडलेल्या शेतकर्यांचे माहीती अभावी होणारे संभाव्य नुकसान टाळावे.